26.9 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20211023 WA0004
महाराष्ट्र

हुनर बिझनेस नेटवर्क तर्फे समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा

Bundelikhabar

मुंबई /गुरुदत्त वाकदेकर

समाजाच्या विविध घटकातील कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची दखल घेत त्यांना सन्मानित करण्याबरोबरच इतरांनाही प्रोत्साहित करणारा हुनर बिझनेस नेटवर्कचा शानदार सन्मानसोहळा अंधेरी येथे संपन्न झाला. हुनर बिझनेस नेटवर्कच्या संस्थापक आणि ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक शगुफ्ता मुमताज आणि ब्रॅण्ड एम्बॅसेडर असिफ नूर हसन यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती पदक विजेत्या शोभा नाखरे, उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला संपादिका शांता वाणी, रामचंद्र प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा तसेच पत्रकार अशोक शिंदे, साहित्यिक, पत्रकार तसेच समाजसेवक गुरुदत्त वाकदेकर, लेखिका तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. मेहरा श्रीखंडे, रवी नायर, नितीन नाईक, लेखिका तसेच प्रकाशक लता गुठे, राजश्री खुस्पे आदी मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
हुनर बिझनेस नेटवर्क हे नवोदित आणि उदयोन्मुख उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी कार्यरत आहे. नवोदितांच्या व्यवसाय वृद्धीसाठी तसेच बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्यात येतो. यात हजारोंच्या संख्येने सदस्य असून ते भारताच्या विविध भागात विखुरलेले आहेत. त्यांचा ऐकमेकांशी समन्वय साधण्याचे कामदेखील संस्थेच्या वतीने करण्यात येते. यापुढील काळात हे क्षेत्र अधिक व्यापक करण्याचा विचार यावेळी शगुफ्ता मुमताज आणि असिफ नूर हसन यांनी व्यक्त केला आहे.


Bundelikhabar

Related posts

समाजसेवक शंकर गुप्ता का निधन, वणिका दर्पण के संपादक शुभनारायन साह को सदमा

Bundeli Khabar

एम्पॉवर डायरेक्ट सेलिंग एंड बिजनेस अवार्ड और अमेरिकन यूनिवर्सिटी का डॉक्टरेट डिग्री डिस्ट्रीब्यूशन समारोह का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

नियमन-आधारित गुंतवणूक माध्यमांच्या माध्यमातून मिलेनियल्सना भांडवल बाजारपेठांचा परिचय

Bundeli Khabar
error: Content is protected !!