40.7 C
Madhya Pradesh
June 8, 2026
Bundeli Khabar
व्यापार

फेड एक्स ‘एसएमई कनेक्ट’ मालिकेमुळे जागतिक संधी मिळविण्यास, लहान व्यवसाय बनतात सक्षम

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुम्बई : फेड एक्स एक्सप्रेस ही फेड एक्स कॉर्प (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एसएमई) वाढीस सहाय्य करीत असते. या अनुषंगाने तिने आपली पहिली व्हर्च्युअल सिरीज, ‘एसएमई कनेक्ट’, ही महाराष्ट्रातील पुणे येथे सादर केली आहे. ‘एसएमई कनेक्ट सिरीज’ची ही चौथी आवृत्ती असून एसएमई कंपन्यांचा उद्योगांशी समन्वय साधून देणारा हा विचार मांडणारा व ज्ञान मिळवून देणारा प्लॅटफॉर्म आहे. एसएमई कंपन्यांशी संबंधित, त्यांच्यावर परिणाम करू शकणाऱ्या विषयांवर तज्ज्ञांच्या मार्फत सोल्यूशन्स देणारी चर्चा या प्लॅटफॉर्मवर घडवून आणली जाते.
उद्योग आधारच्या अलीकडील सर्वेक्षणानुसार, पुणे हे महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचे (एमएसएमई) सर्वात पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. पुण्यात एमएसएमई कंपन्यांची संख्या 2 लाख 14 हजार इतकी आहे. येथील ‘ऑटोमोटिव्ह’ आणि ‘ऑटोमोटिव्ह अॅन्सिलरी’ उद्योगांचा मोठा हातभार एमएसएमई कंपन्यांना लागला आहे. देशातील वाहनांचे सुमारे 35 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. पुणे हे भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल हब झाले आहे.
भारत ही जागतिक ऑटोमोटिव्ह बाजारपेठांपैकी सर्वात जास्त आश्वासक बाजारपेठ आहे. कोरोनाची साथ व टाळेबंदी यांचा मोठा फटका भारतातील याही उद्योगाला बसला. आता त्याची परिस्थिती सुधारू लागली आहे. त्या अनुषंगाने, ‘इंडियन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री : शिफ्टिंग गियर्स रिसिलिएन्स टू रिसर्जेन्स’ या संकल्पनेवर आधारीत व्हर्च्युअल एसएमई सत्र आयोजित करण्यात आले आहे. ऑटोमोटिव्ह उद्योगावर कोरोना साथीचा झालेला परिणाम, ऑटो पुरवठा साखळीत लवचिकता निर्माण करण्याचे प्रयत्न, ‘डिसरप्टिव्ह’ तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि भारताला ऑटोमोबाईल्सचे हब बनवण्याची प्राधान्य क्षेत्रे या विषयांवर या सत्रामध्ये उद्योगातील अग्रगण्य तज्ञ आपले विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमात बोलताना, FedEx Expressचे ऑपरेशन्स विभागाचे उपप्रमुख महंमद सायेघ म्हणाले, “एसएमई उद्योगाला जागतिक संधी मिळाव्यात, यांकरीता आमच्या जागतिक नेटवर्कचे सामर्थ्य, खास तयार करण्यात येणारी सोल्यूशन्स आणि मूल्यवर्धित सेवा यांद्वारे हा उद्योग जगाशी जोडून घेण्यात FedEx महत्त्वाची भूमिका बजावते. भारतातील वाढत्या ऑटोमोटिव्ह उद्योगावर केंद्रित असलेल्या एसएमई कनेक्ट मालिकेची चौथी आवृत्ती सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे.”
‘FedEx एसएमई कनेक्ट’मध्ये स्थानिक बाजारपेठेशी संबंधित खास तयार केलेल्या विषयांवर भर देण्यात येतो. लहान व्यवसायांना मार्गदर्शन, तसेच नाविन्यपूर्णतेच्या व शिकण्याच्या टिप्स देण्याकरीता यामध्ये उद्योगातील तज्ज्ञांच्या पॅनेल चर्चा आयोजित करण्यात येतात.
“भारतातील ऑटो कॉम्पोनन्ट क्षेत्रात एक तृतियांश इतका वाटा असलेल्या एसएमई कंपन्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत असतात, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात आणि भारताचा निर्यात व्यापार वाढवतात. एसएमई कंपन्यांना त्यांच्या जागतिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करताना, त्यांची सोल्यूशन्स तयार करण्यात व जागतिक संधींसाठी त्यांना सज्ज करण्यात ‘FedEx एसएमई कनेक्ट सिरीज’मध्ये व्यक्त झालेले विचार उपयुक्त ठरतील, असा आमचा विश्वास आहे,”असे सायेघ यांनी नमूद केले.
उद्योजकांना आणि लहान व्यवसायांना सहाय्य करण्याचा FedEx चा मोठा इतिहास आहे. या व्यवसायांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी FedEx कटिबद्ध आहे. या वर्षाच्या सुरुवातीला FedEx ने कोविड-19 साथीमुळे प्रभावित झालेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक संसाधने प्रदान केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात 700 हून अधिक महिलांच्या नेतृत्वाखालील लहान व्यवसायांचे सक्षमीकरण केले.


Bundelikhabar

Related posts

ओकिनावा ऑटोटेक ने नवी मुंबई में खोला अत्‍याधुनिक गैलेक्‍सी स्‍टोर

Bundeli Khabar

७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्ही लॉन्च

Bundeli Khabar

रक्षाबंधन त्यौहार पर ‘शेमारू स्पीकर्स’ का उपहार

Bundeli Khabar
error: Content is protected !!