29.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांसह निर्देशांकांची आठवड्याची सुरुवात घसरणीने
व्यापार

जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांसह निर्देशांकांची आठवड्याची सुरुवात घसरणीने

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांसह निर्देशांकांनी आठवड्याची सुरुवात सपाट पातळीवर केली. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की बाजार सुरू झाल्यानंतर लगेचच निफ्टीत घसरण झाली मातब्बर आर्थिक संस्था (हेवीवेट फायनान्शियल काऊंटर्स) आणि रिलायन्सने या घसरणीत सर्वाधिक योगदान दिले.आयटी आणि मेटल क्षेत्रात झालेल्या प्रतिक्षेपाच्या जोरावर निर्देशांक मात्र आपल्या नीचांकी पातळीवरून सावरू लागला. नीचांकी पातळीवरून सुमारे ८५ अंकांची सुधारणा नोंद करत, निफ्टी निर्देशांकाने दिवसाचा शेवट किंचित कमी पातळीवर केला।


स्मॉल कॅप आणि मिडकॅप निर्देशांकांनी बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकत अनुक्रमे ०.५४ टक्के आणि ०.४५ टक्के वाढ केल्यामुळे व्यापक बाजारांनी आपली रॅली सलग ३ दिवसांपर्यंत वाढविली. निफ्टी बँक निर्देशांकांने जबरदस्त घसरण नोंदविल्याने बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रे सर्वाधिक गमावलेल्या निर्देशांकांमध्ये आघाडीवर होती. निफ्टी बॅंक निर्दशकाने दिवसाच्या उच्चांकापेक्षा २५० अंकांपेक्षा कमी नोंद केली आणि सलग दुसऱ्या सत्रात घसरण वाढली. तर, निफ्टी मीडिया १ टक्क्यांहून अधिक नफा मिळवून अव्वल स्थानावर होता. त्यानंतर मेटल आणि आयटी क्षेत्रांनी नफ्याची नोंद केली. समभागांच्या विशिष्ट बाजूने, कोल इंडिया, हिंडाल्को आणि टीसीएस यांनी अव्वल फायदे नोंदविले, तर रिलायन्स, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर हे आजच्या सत्रातील पराभूत खेळाडू होते. त्यांनी १-२ टक्के घसरण नोंदवली।


शुक्रवारी व्यापाराच्या दिवशी अमेरिकेच्या बेंचमार्क निर्देशांकांवर दबाव आला. डाऊन मूव्हसह, डाऊ आणि एस अँड पी यांनी सलग पाचव्या सत्रात ५०० अंकांच्या खाली बंद झाले. सुट्टीसह कामकाजाचे कमी दिवस असलेल्या आठवड्यात डाऊ २.२ टक्क्यांनी घसरला, तर एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक अनुक्रमे १.७ टक्के आणि १.६ टक्क्यांनी घसरला. वॉल स्ट्रीटच्या तीन प्रमुख निर्देशांकांचे वायदा सकारात्मक पातळीवर व्यापार करीत आहेत. डाऊ जोन्स फ्युचर्स ०.६३ टक्क्यांनी, नॅस्डॅक फ्युचर्स ०.५९ टक्क्यांनी आणि एस अँड पी ५०० फ्युचर्स ०.६१ टक्क्यांनी वाढ नोंदवली. युरोपियन आघाडीवर असताना निर्देशांक सकारात्मक पातळीवर व्यापार करत आहेत।


थोडक्यात सांगायचे तर, दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरत निर्देशांक जवळजवळ सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स १२७ अंकांच्या कपातीने किंवा ०.२२ टक्क्यांनी घसरून ५८१७७ वर थांबला आणि निफ्टी ५० निर्देशांक नकारात्मक १४ अंकांनी खाली येत तो सपाट पातळीवर १७३५५ अंकांवर थांबला. निफ्टीसाठी येत्या काही दिवसांत लक्षीत पातळी १७५०० वर असेल आणि नकारात्मक बाजूवर, १७१५० – १७१०० ही लक्षीत पातळी असेल।

Related posts

फलों का संरक्षण करने के लिए ‘आईजी आत्रेयास’ की स्थापना

Bundeli Khabar

जीसीपीएल ने लॉन्च किया गोदरेज मैजिक बॉडीवाश, शाहरुख खान बने ब्रांड एंबेसडर

Bundeli Khabar

ट्रूक ने लॉन्च किया गेमिंग टीडब्ल्यूएस ‘बीटीजी अल्फा’

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!