23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » नोशन प्रेस मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसायात करणार पदार्पण
महाराष्ट्र

नोशन प्रेस मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसायात करणार पदार्पण

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र,

मराठीमध्‍ये १०,००० पुस्‍तके प्रकाशित करण्‍याचे ध्येय

मुंबई : भारतातील सर्वात मोठी पुस्तक प्रकाशन संस्था नोशन प्रेसने मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. आपली पुस्‍तके प्रकाशित करण्‍यासोबत जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या मराठी भाषिक लेखकांसाठी ही उत्तम बातमी आहे. लेखक वापरण्‍यास सुलभ अशा ऑनलाइन साधनांच्‍या माध्‍यमातून फक्‍त ३ पाय-या पार केल्यानंतर त्‍यांची पुस्‍तके प्रकाशित करून दुकानांत विक्रीसाठी पाठवू शकतात. लेखकांना त्‍यांच्‍या पुस्तक प्रकाशन प्रक्रियेच्‍या कोणत्‍याही टप्‍प्‍यावर संभाषण व ईमेलच्‍या माध्‍यमातून साह्य केले जाते.
ही प्रकाशन संस्था हिंदी, तामिळ, बंगाली आणि मल्याळम या भाषांत साहित्य प्रकाशित करते. यासाठी लेखकांना पाठिंबा देते. याचा अर्थ असा की, भारतीय लेखक आता पेपरबॅक आणि ईबुक स्वरूपात त्यांच्या पसंतीच्या भाषांमध्ये त्यांची पुस्तकं प्रकाशित करू शकतात, जी शंभरहून अधिक देशांत विकली जाऊ शकतील.
नोशन प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन वल्साकुमार म्हणाले की भारतीय भाषांतील पुस्तकांची मागणी नेहमीच प्रचंड राहिली आहे आणि आगामी वर्षांमध्ये ही मागणी वाढतच जाणार आहे. आता वाचकही विविध विषयांवरील पुस्तकं वाचू इच्छितात, मग त्या प्रादेशिक कविता असोत वा कादंबऱ्या, शैक्षणिक पुस्तके असोत वा सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तके असोत. आम्ही ही सर्व प्रकारची पुस्तकं प्रकाशित करण्याची क्षमता बाळगून आहोत, याचा आम्हाला आनंद वाटतो. मराठी प्रकाशन व्यवसायात उतरण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही जगभरच्या वाचकांना अशा अनवट कथांचा परिचय करून देऊ इच्छितो ज्या त्यांची वेगवेगळ्या संस्कृतींशी ओळख करून देतील.’’
नोशन प्रेस पब्लिशिंग हे अद्वितीय डू-इट-युअरसेल्‍फ व्‍यासपीठ आहे. हे व्‍यासपीठ महत्त्वाकांक्षी लेखकांना फक्‍त ३० मिनिटांमध्‍ये सर्वोत्तम पुस्‍तके प्रकाशित करण्‍यामध्‍ये सक्षम करते. हे व्‍यासपीठ अनेक सुविधा देते, ज्‍यामध्‍ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रकाशन प्रक्रियेचा समावेश आहे. ज्‍यामुळे लेखकांना पुस्तक प्रकाशनातील सर्जनशीलतेवर नियंत्रण ठेवता येते. नोशन प्रेस पब्लिशिंग प्लॅटफॉर्मचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णतः मोफत आहे.
चेन्‍नई येथे मुख्‍यालय असलेल्‍या आणि २०१२ साली स्‍थापन झालेल्या नोशन प्रेससोबत जगभरातील लेखक आहेत. कंपनीने यशस्‍वीरीत्‍या ४०,००० हून अधिक पुस्‍तके प्रकाशित करण्‍यासोबत १५० हून अधिक देशांमध्‍ये त्‍यांची विक्री केली आहे. नवीन म्‍हणाले नोशन प्रेसचे ध्येय ज्यांच्याकडे सांगण्यासाठी कथा आहेत त्या सर्वांना प्रकाशन प्रक्रिया उपलब्‍ध करून देण्‍याचे आहे. आम्‍ही अनेक प्रकारची संधी देण्‍याची आशा करतो, ज्‍यामुळे नवीन उदयोन्‍मुख लेखकांना वाचकांच्या पूर्णत: नवीन विश्‍वामध्‍ये सामावून जाण्‍यास वाव मिळेल. लेखन व वाचन करण्याची संधी भारतातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला उपलब्‍ध होईल, मग ती व्‍यक्‍ती कोणीही असो आणि ती कोणत्‍याही भाषेमध्‍ये बोलत असो, त्‍यांना उत्तम सुविधा मिळतील.


Bundelikhabar

Related posts

नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगार वर्गाला शेतावर जाऊन अनेक संस्थांच्या माध्यमातून मदतीचा हात देणारे कमांडर मनिलाल शिंपी- डॉ. किशोर पाटील

Bundeli Khabar

मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ जाहीर

Bundeli Khabar

शिवम हॉस्पिटलचे डॉ. नवनीत म्हात्रे यांचे सुपुत्र विनय म्हात्रे झाले एम बी बी एस

Bundeli Khabar
error: Content is protected !!