30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211113 WA0017
महाराष्ट्र

जो पर्यंत हे प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही- डी.के. म्हात्रे

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा श्री डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे वाहतुक विभागाचे उपायुक्त मा श्री बाळासाहेब पाटिल यांची सदिच्छा भेट घेऊन भिवंडी शहर व ग्रामीण भागाला लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण सोडविण्यासाठी निवेदन देऊन चर्चा केली .ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी करावी, मानकोली ते रांजनोली पाईपलाईन रस्ता खुला करावा,सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळात मल्टि एक्सल वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये.भिवंडी करांची वाहतुक कोंडीतून सुटका होण्यासाठी योग्य नियोजन करावे.या असंख्य प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.मा पोलीस उपायुक्त यांनी सर्व समष्या समजून घेत लवकरच यातून मार्ग काढू व भिवंडी करांची वाहतूक कोंडीतून सुटका करू असे आश्वासन या चर्चे वेळी दिले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने मा श्री डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व मुद्यांवर पाठपुरावा करत आहे,आंदोलन करत आहे जो पर्यंत हे प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही.असे मनसे प्रदेश उपाध्यक्ष श्री डी के म्हात्रे यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलतांना सांगितले. या वेळी श्री संजय पाटील ठाणे जिल्हा सचिव श्री संतोष म्हात्रे तालुका संघटक वाहतूक सेना हे उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

वरिष्ठ फिल्म पत्रकार काली दास पाण्डेय झारखंड में सम्मानित

Bundeli Khabar

दिव्यांगों को रोजगार दिलाने के लिए आगे आया समर्थम ट्रस्ट

Bundeli Khabar

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत ऑरोने गुढीपाडवा केला साजरा

Bundeli Khabar
error: Content is protected !!