25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगार वर्गाला शेतावर जाऊन अनेक संस्थांच्या माध्यमातून मदतीचा हात देणारे कमांडर मनिलाल शिंपी- डॉ. किशोर पाटील
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगार वर्गाला शेतावर जाऊन अनेक संस्थांच्या माध्यमातून मदतीचा हात देणारे कमांडर मनिलाल शिंपी- डॉ. किशोर पाटील

रोटी डे ग्रुप, स्वामीनारायण ट्रस्ट आणि डॉ.सोन्या पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान!
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा सहकारी कारखाना, व शहादा तालुक्यातील परिवर्धा, तऱ्हाडी, डोंगरगाव, मामाचे मोहिदे या शिवारात प्रत्यक्ष ऊस तोडणी होत असलेल्या शेतात जाऊन, ऊसतोड कामगारांना शहादा तालुक्यातील परिवर्धा गावचे स्थानिक भूमिपुत्र ,महाराष्ट्र राज्याचे राजदूत तथा आर. एस. पी. कमांडर उत्तर महाराष्ट्र डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी यांनी रोटी डे ग्रुप,श्री. स्वामीनारायण ट्रस्ट, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य,व कल्याण कच्छ युवक संघ कल्याण या संस्थांच्या माध्यमातून व दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील यांच्या सहकार्याने अगदी थंडीच्या मोसमात ३०० ब्लॅंकेट व २०० साड्या वाटप करून एक नवीन आदर्श नंदुरबार जिल्ह्यात निर्माण केला आहे, कारण अशा गारठलेल्या थंडीत ब्लॅंकेट वाटप करणे व त्याच बरोबर साड्या देणे हा स्तुत्य उपक्रम शहादा तालुक्यातील समस्त नागरिकांना पाहायला मिळाला त्यामुळे तालुक्यातील अनेक होतकरू , हौशी, सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमात सामील झाले होते त्यामुळे या उपक्रमाला वेगळेच वळण मिळाले व हा उपक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला, सदर कार्यक्रमाला दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील ,ठाणे आर एस पी युनिट कमांडर डॉ. श्री.मणिलाल रतिलाल शिंपी, सातपुडा सहकारी कारखान्याचे चेअरमन श्री. दिपक पाटील, एम. डी. श्री अशोक पाटील , संचालक एकनाथ पाटील, गुरुवर्य श्री.आर एस पटेल , सातपुडा साखर कारखान्याचे कृषी अधिकारी अजित सावंत, डॉ.किशोर आमोदकर , सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे सुपरवायझर, फिल्डमॅन, संजय शिंपी,श्री. एकनाथ पाटील श्री.सूर्यवंशी मनोहर श्री.मनोहर चौधरी, औरंगपूर येथील श्री.भैय्या भाई पाटील, संकल्प ग्रुप चे श्री.मुकेश पटेल,श्री.लक्ष्मीकांत पटेल,श्री.प्रमोद मोरे,(माध्य.शिक्षक ) श्री. लक्ष्मण कोळी (तलाठी) , शहादा शिंपी समाज कार्यकर्ते श्री.प्रकाश चित्ते, श्री.दिनेश नेरपगार आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ऊसतोड कामगारांना ब्लॅंकेट व महीला कामगारांना साड्या वाटप करण्यात आल्या.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प सेवा ग्रुप शहादा, समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष तथा धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील, रोटी डे ग्रुप कल्याण कच्छ युवक संघ कल्याण आणि श्री. स्वामिनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.श्री.दिनेश भाई ठक्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगार वर्गाला शेतावर जाऊन वरील संस्थांच्या माध्यमातून मदतीचा हात देणारे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचे खरोखरच कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे यावेळी डॉ. किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, मला हे सामाजिक कार्य करताना अनेक संस्थांनी मोलाचे योगदान देऊन सहकार्य केले केले आहे व यापुढे हि करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो व पुढील महिन्यात मदत करणाऱ्या सर्व संस्थांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेऊ असे आश्वासन कमांडर मणिलाल शिंपी यांनी यावेळी दिले.

सातपुड्याच्या पायथ्याशी खरोखर गरजू आणि थंडीच्या वातावरणात योग्य वेळी ब्लँकेट व साड्या वाटप करून एक नवा आदर्श आमच्या समोर उभा केला आहे याबद्दल सातपुडा साखर कारखान्याच्या वतीने व नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने , आर.एस.पी.कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, व वरील सर्व दानशूर दात्यांचे सातपुडा कारखान्याचे चेअरमन श्री.दीपक बापू पाटील यांनी कौतुक करुन सर्वांचे आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

Related posts

कोरोना च्या या वातावरणात महाआरोग्य शिबिर घेऊनअजून कोरोना संपला नाही हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दाखवून दिले – राजेश नार्वेकर

Bundeli Khabar

गोवंडीत झाला युवकांसाठी रोजगार मेळावा

Bundeli Khabar

भारताने इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवला

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!