23.6 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210930 WA00212
महाराष्ट्र

अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना घोषित करून अनुदान द्यावे ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : अघोषित प्राथमिक ,माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना घोषित करून अनुदान मिळावे तसेच कनिष्ठ महाविद्यालय वाढीव पदांना मंजुरी मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून शिक्षण आयुक्त पुणे या ठिकाणी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर बांधवांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या दोन्ही आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे व मुंबई उत्तर विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री नरेंद्र शिंदे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांशी चर्चा केली तसेच शिक्षण संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची दोन्ही विषय मार्गी लागण्यासाठी भेट घेतली. तसेच शिक्षण क्षेत्रातील हे सर्व प्रश्न सुटावेत म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे हे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेणार आहेत ,त्या भेटीमध्ये या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार आहेत.अशी माहिती–विष्णू विशे संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक सेना यांनी आमचे प्रतिनिधि डॉ.मनिलाल शिंपी यांच्याशी बोलताना दिली.


Bundelikhabar

Related posts

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Bundeli Khabar

ठाणे जिले के ४३१ गांवों में से ३५२ गांव कोरोनामुक्त

Bundeli Khabar

बूमिंग बुल्सद्वारे कर्मचारी भरतीची घोषणा

Bundeli Khabar
error: Content is protected !!