28.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » माणसातला देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगे महाराज होय – डॉ.मनीलाल शिंपी
महाराष्ट्र

माणसातला देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगे महाराज होय – डॉ.मनीलाल शिंपी

ब्युरो/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वालशिंद टेपाचा पाडा येथे साधारण १५०/२०० गरीब गरजू आदिवासी बांधवांना दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ओम साई प्रतिष्ठान वालशिंद चे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री यशवंत महादू सोरे यांच्या वतीने आर एस पी कमांडर कल्याण ठाणे युनिटचे डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी व दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांच्या विशेष सहकार्याने व जेजस ईज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर ३,यांच्या सौजन्याने नुकताच मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला .सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर एस पी कमांडर कल्याण ठाणे युनिटचे डॉ. मनीलाल रतिलाल शिंपी, ओम साई प्रतिष्ठान वालशिंद चे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री. यशवंत महादू सोरे, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री. किशोर बळीराम पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री काका पाटील, जेजस ईज लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष श्री मुकेश ग्वालानी, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गौरव सचदेव, श्री. अमित कुकरेजा, , पंकज ब्रदर, हरेश ग्वालानी, संतोष मोगरे ,अशोक सोरे,संतोष सोरे,अशोक भेकरे,
दिनेश पाटील,निलेश भंडारी, अनिल भेकरे, भंडारी मामा, श्री. मनोज (उल्हासनगर) व आदी मान्यवर मोठ्या संख्येने आदिवासी महिला, बांधव उपस्थित होते.
परमेश्वराने आपले शरीर हे एका गाडीच्या स्पेअर पार्ट प्रमाणे बनविलेले आहे हात, पाय, कान ,डोळे, नाक, अशाप्रकारे आहेत आपन सर्व पार्ट बदलू शकतो मात्र यामध्ये डोक्याचा पार्ट आहे तो बदलता येऊ शकत नाही, त्याला रिप्लेस मेंट नाही,म्हणून गाडी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शिटबेल्ट लावणे गरजेचे आहे. आता हा विषय शासनाने शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायला घेतला आहे.म्हणजे एखाद्या व्यक्तीने गाडी घेतली तर त्या व्यक्तीचा मुलगा त्यांना सांगू शकेल की बाबा गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करा अथवा शिट बेल्ट लावा असा संदेश आमच्या रस्ता सुरक्षा दल या विभागाकडून दिला जातो कोरोना काळात सेवा करत असताना आम्हाला अनेक अनुभव आले व अनेक हात मदतीचे आले त्यामुळे आम्हाला अनेक देवदूत लाभले त्यांच्यामुळे आम्ही तीस रिक्षा रुग्णांच्या सेवेसाठी त्यांना दवाखान्यात नेण्यापासून ते औषध व जेवण घरापर्यंत पोचविण्याचे काम आमच्या आर एस पी विभागाकडून करण्यात आले हे काम करत असताना माझ्या सह आमच्या संपूर्ण टीमला कोरोना ची लागण झाली नाही, १३ जणांचा अंत्यविधी मी स्वतः केला त्यामध्ये ठाण्याचे माजी महापौर यांचाही समावेश आहे त्यांच्या गळ्यामध्ये दोन किलो सोनं होतं मात्र त्यांच्या मुलांना फोन केला असता त्यांनी सांगितले त्यांचा मृत्यू देह तिकडेच जाळून टाका १५०० कोटींचे मालक होते ते,कोणासाठी कमविले पैसे, या मुले माणुसकी कोरोनाने शिकवली, म्हणून माणसातला माणूस माणसातला देव येथे उपस्थित असलेल्यांमध्ये मला दिसून येत आहे म्हणून एकच सांगतो की, माणसातला देव शोधा, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे या भूमीमध्ये अनेक संत-महात्मे होऊन गेले त्यापैकीच संत गाडगे महाराज होय, संत गाडगे महाराजांनी ग्राम स्वच्छता ही शिकवली व माणसाचे मन स्वच्छ करायलाही शिकवले , म्हणून माणसातला देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगे महाराज होय,अशा संतांचे आचरण करायला आपन शिकले पाहिजे असे मार्ग दर्शन करताना डॉ. मनीलाल शिंपी यांनी सांगितले,
सर्वप्रथम मी आपणा सर्वांना दीपावली निमित्त शुभेच्छा देतो आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले ओम साई प्रतिष्ठान वालशिंद यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो. तसेच जेजस ईज लाईफ फाउंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ही आभार मानतो, कारण ते अतिशय स्तुत्य उपक्रम घेऊन आपल्या दारी आले आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजू बांधवांना घरापर्यंत मदत पोहचवत आहेत, म्हणून ते खऱ्या अर्थाने देवदूताचे काम करत आहेत, त्यांना आमच्यापर्यंत पोचविण्यासाठी कमांडर मणिलाल शिंपी साहेब व संपादक किशोर पाटील साहेब यांनी प्रयत्न केले माननीय शिंपी साहेब व किशोर पाटील साहेब यांचे महाराष्ट्रातील अनेक संस्थांशी चांगले संबंध आहेत त्यामुले त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात १८ जिल्ह्यात या संस्थांच्या सहकार्यामुले गोर गरीब व निराधाराना मदतीचा हात पुढे केला व मदत पोहचविलि,
आपण स्वतःसाठी सगळेच जगत आहोत ,मात्र दुसऱ्यांसाठी जगण्यात मजा काही वेगळीच असते, म्हणून दुसऱ्यांसाठी जगायला शिका,
असे ओम साई प्रतिष्ठान वालशिंद चे संस्थापक अध्यक्ष यशवंत सोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच ते पुढे म्हनाले की, आपण आयुष्यात भरपूर काही कमवतो आपलं आयुष्य कामातच निघून जातो परंतु आपण दुसऱ्यासाठी थोडा जरी वेळ दिला तरी त्या वेळेला लाख मोलाची किंमत असते त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिलते,शेवटी एवढेच सांगेन की सीमेवरील जवान आपल्या रक्षणासाठी त्यांचे जीवन अर्पण करतात तशाच प्रकारे आपणही दुसऱ्यांसाठी काम करण्याची जिद्द मनात ठेवली पाहिजे जिद्द असेल तर म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे दिवाळी निमित्ताने चायना च्या वस्तू खरेदी करू नका त्या वस्तूंवर येणाऱ्या काळात बहिष्कार टाका अशाप्रकारे आपले जवान जे सीमेवर हुतात्मे होतात त्यांना आदर्श श्रद्धांजली म्हणून आपण टाकलेला बहिष्कार अर्पण करू शकतो.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांनी केले.

Related posts

एक्टर हर्ष बेनीवाल और ऋत्विक सहोरे का जिंदगी बदल देने वाले एडवेंचर से लेकर एडल्टहुड में मिलने वाले सबक तक

Bundeli Khabar

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार

Bundeli Khabar

भिवंडीत HP गॅस सिलिंडर ट्रक ने पादचाऱ्यास चिरडले.

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!