29.6 C
Madhya Pradesh
July 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211102 WA0019
महाराष्ट्र

आदिवासी महिलांना शेतात जाऊन भाऊबीज भेट देण्यात मनाला आनंद वाटतो – सोन्या पाटील

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या समाज कल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये जाऊन आदिवासी महिलांना व त्यांच्या मुलांना दीपावली निमित्त भाऊबीज भेट तसेच मिठाई व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम गेल्या अनेक वर्षा पासून करत असल्या मुले या आदिवासी महिला सोन्या दादा पाटील कधी येतील याची आवर्जुन वाट पहात असतात म्हणून आज सोमवार दि. १/११/२०२१ रोजी वाडा तालुक्यातील आदिवासी कातकरी पाड्यांमध्ये जाऊन आदिवासी महिलांना साड्या व त्यांच्या मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या.
१ नोव्हेम्बर ते ५ नोव्हेम्बर २०२१ दरम्यान भाऊबीज भेट तसेच मिठाई व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली. तसेच आदिवासी महिलांना शेतात जाऊन भाऊबीज भेट देण्यात मनाला आनंद वाटतो असेही त्यानी यावेळी सांगितले. प्रथम पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील जीवन ज्योत युवा मंडळ गातेस् बु. , समाज कल्याण न्यास महिला आघाडी वाडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गातेस् बु.,कुडुस डोंगस्ते ,कातकरी वाडी,मेट,या ठिकाणी मिठाई व साड्या वाटप करण्यात आल्या,
यावेळी समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ.सोन्या काशिनाथ पाटील, पालघर जिल्हा सचिव प्राध्यापक धनंजय पष्टे, कार्यकारी सदस्य श्री राजेंद्र काबाडी, पंचायत समिती वाड्याचे उपसभापती श्री अमोल पाटील, माजी सभापती श्री योगेश गडा, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष श्री प्रकाश पाटील , वाडा तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. रेश्मा पाटील ,वाडा शहर अध्यक्ष श्री संदीप पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन भेरे ,दिनेश जाधव , जीवन ज्योत युवा मंडळाचे अध्यक्ष नितीन गोतरणे, अविनाश गोतरणे, आदी मान्यवर व मोट्या संख्येने आदिवासी महिला व बालक उपस्थित होते.
सोन्या पाटील यांनी समाज कल्याण न्यास ही संस्था स्थापन करण्यामागचा एकच उद्देश म्हणजे समाजाचे कल्याण हाच माझा ध्यास म्हणून समाज कल्याण न्यास होय त्यांना वाडा तालुक्यामध्ये वीस वर्षांपूर्वी मी घेऊन आलो होतो व तेव्हापासून ते आजतागायत त्यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांना व त्यांच्या मुलांना भाऊबीज भेट अखंडितपणे सुरू आहे असे यावेळी प्राध्यापक धनंजय पष्टे यांनी सांगितले .इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी अशाप्रकारे छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झालेलं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. संस्था स्थापन करणे हे सोपे काम आहे परंतु ती अविरतपणे सुरू ठेवणे हे जिगरीचे काम आहे . दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या उक्तीप्रमाणे धर्म सेवक डॉ. सोन्या पाटील साहेब यांचे आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो .त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे काम मोठ्या उत्साहात सुरू ठेवले आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असे सोन्या पाटील आहेत हे आपण नाकारू शकत नाही असे यावेळी राजेंद्र काबाडी यांनी सांगितले.यानंतर नितीन गोतरणे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्र संचालन श्री. अविनाश गोतरणे यांनी केले.व श्री. अमोल पाटील ,श्री.योगेश गडा सौ. रेश्मा पाटील यांनी हीआपले विचार मांडले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण न्यासच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.


Bundelikhabar

Related posts

पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित वोक्हार्ट फाऊंडेशन कला व विज्ञान उच्च माध्यमिक आश्रमशाळा – नुतन इमारत उदघाटन व हस्तांतरण समारंभ.

Bundeli Khabar

सुनील पाल और अरुणा नाभ की उपस्थिति में माधानी ग्रुप कंपनी के नये ऑफिस का उद्घाटन

Bundeli Khabar

दुनिया देखने के सपने को पूरा करने के लिए भारतीय दिन-प्रतिदिन के खर्चों में कटौती: कायक

Bundeli Khabar
error: Content is protected !!