32.7 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
महाराष्ट्र

सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था अंजुर फाटा भिवंडी म्हणून ओळखली जाते या पतसंस्थेच्या गेली पंचवीस वर्ष दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा केला जातो मात्र covid-19 मुले गेल्या वर्षी हा कार्यक्रम साजरा करता आला नाही यावर्षी मात्र हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमा निमित्ताने रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते व यामध्ये सह्याद्री पतसंस्थेतील सर्व सभासद ,ठेवीदार, संचालक,शाखा अधिकारी, कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी
या सर्वांना स्पर्धेत सहभागी होता येते त्यामुळे ही स्पर्धा रंगतदारपणे मोठ्या उत्साहाने
आपल्याला आवडेल त्या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कला सादर करत असतात यानिमित्ताने आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना चांगल्या प्रमाणात वाव मिळतो म्हणून ही स्पर्धा स्नेहसंमेलन निमित्ताने उस्ताह पूर्ण वातावरणात संपन्न होते सदर स्नेहसंमेलन व स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी श्री. विश्वासजी थळे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील ,सचिव डॉ.प्रमोद पाटील, संचालक श्री. देवराज म्हात्रे ,श्री. हनुमान माळी ,श्री. सुदाम भोईर, सौ. स्नेहा सुरेश कारेकर, सौ.सुरेखा सोनबा जाधव, सौ. वैजंयती विश्वास थळे संचालीका श्रीसखी महिला पतसंस्था,सौ.जयश्री प्रमोद पाटील ,श्री. सुभाष विठ्ठल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. संजय यशवंत पाटील सर – व्यवस्थापक, सौ. अनिता चंद्रकांत ताटे शाखाधिकारी मानकोली,श्री. विजय गोपीनाथ पाटील शाखाधिकारी टेमघर, सौ. संगीता किशोर पाटील शाखाधिकारी शिवाजीनगर, श्री. अनंता जैतु पाटील शाखाधिकारी सावाद, श्री.मेननाथ कृष्णा भोईर शाखाधिकारी पडघा, तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होते.
गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत सह्याद्री पतसंस्था ही आपली पत जोपासून काम करत आहे कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार होत नाही होऊ दिला जात नाही त्यामुळे सह्याद्री चे नाव भिवंडीच्या कानाकोपर्‍यात पसरले आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आई-वडिलांचे उपकार फेडण्यासाठी पुत्रत्वाची भावना मजबूत करावी लागते तरच आई वडिलांचे उपकार आपण फेडू शकतो, ज्याला आई वडिलांचे उपकार खेळण्याची संधी मिळाली तो भाग्यवान माणूस ज्यांना आई दिसलीच नाही तो दुर्दैवी माणूस जाता जाता एवढेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी सगळ्यांवर प्रेम करा आपण या दुनियेत आलो आहोत आपल्याला परमेश्वराने या धरतीवर पाहुणा म्हणून पाठवले आहे ज्या दिवशी आपलं काम संपते त्या दिवशी आपल्याला मृत्युलोकात जावे लागेल एका शाहीर आणि म्हटले आहे की सजनरे झुट मत बोलो खुदा के पास जाना है नहाती है ना घोडा है वहा पैदल ही जाना है याचा अर्थ करोडपतीचे प्रेत ही स्मशानात जळते व भिकार्‍याचे प्रेत ही स्मशानातच जळते तेथे कोणताही भेदभाव नसतो मग आपल्या डोक्यात अहंकार कशाला पाहिजे त्यासाठी आपण माणसाप्रमाणे वागलं पाहिजे , माणुसकी जपली पाहिजे, सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन करताना सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विश्वास थळे यांनी सांगितले..
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डॉ.प्रमोद पाटील यांनी केले होते तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री संजय पाटील यांनी केले.

Related posts

146 जिला परिषद कर्मचारियों के तबादले

Bundeli Khabar

ठाणे के अतिरिक्त पुलिस आयुक्त बने रामनाथ पोक

Bundeli Khabar

सनदी अधिकारी घडविण्यासाठी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!