30.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » गूडनाइट गोल्‍ड फ्लॅश व करीना कपूर खानचा डिजिटल जाहिरातीसाठी सहयोग, लोकांना मलेरिया व डेंग्‍यूपासून सुरक्षित राहण्‍याचे आवाहन
महाराष्ट्र

गूडनाइट गोल्‍ड फ्लॅश व करीना कपूर खानचा डिजिटल जाहिरातीसाठी सहयोग, लोकांना मलेरिया व डेंग्‍यूपासून सुरक्षित राहण्‍याचे आवाहन

गायत्री साहू/महाराष्ट्र,

मुंबई : गूडनाइट या भारताच्‍या अग्रगण्‍य घरगुती कीटकनाशक ब्रॅण्‍डने कीटकांमार्फत होणा-या आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्‍याकरिता एका नवीन डिजिटल जाहिरातसाठी अभिनेत्री करीना कपूर खान यांच्‍यासोबत सहयोग केला आहे. ही जाहिरात पहिल्‍यांदाच करीना यांच्‍या इन्‍स्‍टाग्राम अकाऊंटवर दाखवण्‍यात आली. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून गूडनाइट व करीना लोकांना मलेरिया व डेंग्‍यूपासून सुरक्षित राहण्‍याचे आवाहन करत आहेत. या जाहिरातीमध्‍ये गूडनाइट गोल्‍ड फ्लॅश आहे, जे भारताचे सर्वात शक्तिशाली लिक्विड वेपरायझर असून घराच्‍या कानाकोप-यामध्‍ये लपलेल्‍या आणि कुटुंबियांच्‍या आरोग्‍यासाठी धोकादायक असलेल्‍या डासांपासून संरक्षण करते.
करीना कपूर खान या भारतातील सर्वाधिक फॉलो केल्‍या जाणा-या सुपरस्‍टार्सपैकी एक आहेत. काळजी घेणारी आई व पत्‍नी असलेल्‍या अभिनेत्री त्‍यांच्‍या संपूर्ण कुटुंबियांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याबाबत खूपच जागरूक आहेत. करीना स्‍वत: त्‍यांच्‍या कुटुंबियांसाठी नियमितपणे डास प्रतिबंधक उपायांचा वापर करतात. म्‍हणूनच करीना व गूडनाइट यांच्‍यामधील सहयोग उत्तम आहे. ब्रॅण्‍ड कुटुंबांचे डासांपासून संरक्षण करण्‍याची खात्री घेण्‍याशी कटिबद्ध आहे.
वंडरमॅन थॉम्‍पसन मुंबई यांची संकल्‍पना असलेल्‍या डिजिटल जाहिरातीमध्‍ये करीना त्‍यांच्‍या मूळ अवतारामध्‍ये दाखवण्‍यात आली आहे, ज्‍यांना त्‍यांच्‍या मुलांबाबत काळजी आहे. त्‍या मास्क न घालता बाहेर पडणे किती धोकादायक ठरू शकते याबाबत सांगतात, कारण कोविड-१९ महामारीविरोधातील आपला लढा अजूनही सुरूच आहे. पण घरामध्‍ये लपलेले शत्रू म्‍हणजेच डासांपासून देखील सुरक्षित राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. डास डोळ्यांनी दिसत नसले तरी ते घराच्‍या कानाकोप-यामध्‍ये लपलेले असतात आणि त्‍यांचा एक चावा डेंग्‍यू व मलेरिया यांसारखे आजार होण्‍यास पुरेसा आहे. पण अभिनेत्री त्‍यांचे घर सुरक्षित ठेवण्‍यासाठी वापरणा-या उपायाबाबत सांगतात. त्‍यांचा भारताचे सर्वात शक्तिशाली लिक्विड वेपरायझर- गूडनाइट गोल्‍ड फ्लॅशवर अधिक विश्वास आहे. हे वेपरायझर त्‍याच्‍या अद्वितीय तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून डासांना दूर करते. हे अद्वितीय तंत्रज्ञान डासांना नष्‍ट करण्‍यासाठी आपोआपपणे फ्लॅश वाफ उत्‍सर्जित करते.
या सहयोगाबाबत बोलताना गोदरेज कन्‍झ्युमर प्रॉडक्‍ट्स लिमिटेडचे भारत व सार्कमधील मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुनिल कटारिया म्‍हणाले, ”आम्‍हाला विश्‍वसनीय आणि प्रभावी असलेल्‍या या जागरूकतेच्‍या प्रसारासाठी करीना कपूर यांच्‍यासोबत सहयोग करण्‍याचा अत्यंत आनंद होत आहे. देशभरात कीटकांमार्फत होणा-या आजारांच्‍या प्रमाणामध्‍ये वाढ होत आहे आणि लोकांना एकच डास त्‍यांच्‍या कुटुंबियांच्‍या आरोग्‍यासाठी धोकादायक ठरू शकतो हे माहित‍ नाही. या जाहिरातीच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍य समूहांमधील जनतेपर्यंत पोहोचत जागरूकता निर्माण करण्‍याचा आमचा मनसुबा आहे. तसेच गूडनाइट गोल्‍ड फ्लॅश घरातील कुटुंबियांचे डासांपासून कशाप्रकारे संरक्षण करण्‍यास मदत करू शकते, हे दाखवण्‍याचा देखील मनसुबा आहे. भारतातील सर्वाधिक फॉलो केल्‍या जाण-या प्रख्‍यात सेलिब्रिटी असण्‍यासोबत करीना त्‍यांचे कुटुंब आरोग्‍यदायी व सुरक्षित असण्‍याची खात्री घेतात. एक ब्रॅण्‍ड म्‍हणून आमचा देखील कुटुंबांच्‍या आनंदी क्षणांचे विनाव्‍यत्‍यय संरक्षण करण्‍याची खात्री घेण्‍याचा दृष्टिकोन आहे.”
या सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत करीना कपूर खान म्‍हणाल्‍या, ”महामारीने आपणा सर्वांना कुटुंब व आरोग्‍याला अधिक प्राधान्‍य देण्‍याची शिकवण दिली आहे. कोणत्‍याही कुटुंबाला डेंग्‍यू व मलेरिया आजारांपासून त्रस्‍त पाहून मला खूप त्रास होतो. माझी इच्‍छा आहे की, माझे कुटुंब किंवा इतर कोणतेही कुटुंब अशा आजारामधून जाऊ नये. जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना सावध करणे हा लोक सुरक्षित असण्‍याची खात्री घेण्‍याकरिता गूडनाइट गोल्‍ड फ्लॅशसोबत माझा विनम्र प्रयत्‍न आहे. मी लोकांना मुलभूत सावधगिरींचा अवलंब करण्‍याचे आवाहन करते, ज्‍यामुळे देश दीर्घकाळापर्यत कीटकांमार्फत होणा-या आजारांपासून सुरक्षित राहू शकतो.”
जाहिरातीच्‍या संकल्‍पनेबाबत बोलताना वंडरमॅन थॉम्‍पसन मुंबईच्‍या व्‍हीपी व एक्झिक्‍युटिव्‍ह क्रिएटिव्‍ह डायरेक्‍टर स्टीव्‍ह प्रिया म्‍हणाल्‍या, ”आपणा सर्वांना सातत्‍याने बाहेरील अदृश्‍य धोक्‍याबाबत माहित आहे. आणि आपण या धोक्‍यापासून सुरक्षित राहण्‍याची प्रत्‍येक खबरदारी देखील घेऊ. पण आपण विसरून जातो की, आपल्‍या घरामध्‍ये देखील धोकादायक डास लपलेले असतात. जसे डेंग्‍यू होण्‍यास कारणीभूत ठरणारा डास. आपल्‍याला हे डास दिसणार देखील नाहीत. आम्‍ही जागरूकता निर्माण करण्‍यासाठी आणि संरक्षणासंदर्भात संदेशाचा प्रसार करण्‍यासाठी भारताच्‍या सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध आईसोबत सहयोग केला. प्रत्‍येक घर दररोज गूडनाइट चालू करत सुरक्षित राहण्‍याची खात्री मिळते.”
अपग्रेडेड हिटिंग तंत्रज्ञान व व्हिजिबल कार्यक्षमता असलेले गूडनाइट गोल्‍ड फ्लॅश भारतातील लिक्विड वेपरायझरमधील गेम चेंजर आहे. या उत्‍पादनामध्‍ये नॉर्मल व फ्लॅश मोड आणि अद्वितीय चिप-आधारित तंत्रज्ञान आहे, जे आपोआपपणे या मोड्सना बदलते. गूडनाइट गोल्‍ड फ्लॅश पहिल्‍या ३० मिनिटांमध्‍ये वाफ उत्‍सर्जित करते आणि त्‍यानंतर आपोआपपणे नॉर्मल मोडमध्‍ये येते. शक्तिशाली, पण सुलभ रिपेलण्‍ट घराच्‍या कानाकोप-यामध्‍ये लपलेल्‍या आणि कुटुंबांच्‍या आरोग्‍याला धोकादायक असलेल्‍या डासांपासून संरक्षणाची खात्री देते

Related posts

महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे – डॉ.मनीलाल शिंपी

Bundeli Khabar

जाणून घ्या अंडाशयाच्या कर्करोगाबद्दल – डॉ सुहास आग्रे

Bundeli Khabar

हत्या के तीन आरोपी पुलिस गिरफ्त में

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!