37.6 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » बिंजबार सादर करत चितळे बंधू यांचा आता चटपटीत स्नॅक्स बार विभागात प्रवेश
व्यापार

बिंजबार सादर करत चितळे बंधू यांचा आता चटपटीत स्नॅक्स बार विभागात प्रवेश

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : २०० कोटी रुपयांची बाजारपेठ म्हणून याकडे बघणार
• भेळ, चिवडा यांसारखे अस्सल पारंपरिक भारतीय चटपटीत पदार्थ आता बिंज बार मधून एका वेगळ्या रुपात सादर होणार; चवीत कोणतीही तडजोड न करता खाण्यासाठी एकदम सोयीस्कर उत्पादन।
८२ वर्षांची समुद्ध परंपरा असलेल्या आणि आपल्या अवीट गोडीच्या पदार्थांसाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू यांनी बिंजबार™ सादर करत चटपटीत स्नॅक्स बार विभागात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. ब्रँडतर्फे पारंपरिक अस्सल भारतीय नमकीन पदार्थ आता बारच्या रुपात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना आता त्यांचे आवडीचे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशा बार मध्ये मिळतील. या उत्पादनांच्या मालिकेत भेळ बार, लेमन भेळ बार आणि लाईट चिवडा बार यांचा समावेश आहे. या सादरीकरणातून केदार आणि इंद्रनील चितळे ही चितळे बंधू मिठाईवाले यांची पुढची पिढी २०० कोटीच्या मह्सुलापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संपूर्णपणे नवीन अशा स्नॅक्स बार विभागात ब्रँड घेऊन येत आहे.
चितळे समुहाचे व्यवस्थापकीय भागीदार श्री.इंद्रनील चितळे म्हणाले, “चितळे बंधू मध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम स्नॅक्स (चटपटीत) पर्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत. अधिक चांगला उत्पादन विकास आणि नाविन्यपूर्णता यांच्या माध्यमातून ग्राहकांना पॅकेजिंगच्या त्रासाशिवाय पारंपरिक चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेता यावा असे आम्हांला वाटते. सध्या हे पदार्थ पिलो पाऊच मध्ये उपलब्ध आहेत. आजवर फारसे लक्ष न गेलेल्या या विभागात व्यवसायाचीही मोठी संधी आम्हांला दिसत आहे. ग्राहक बाहेर फिरताना, कोणत्याही ठिकाणी त्यांना आवडणारे पारंपरिक चटपटीत पदार्थ एकदम सोयीने खाऊ शकतील. ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.”
तोड नसलेली मिठाई आणि चटपटीत पदार्थ यांच्यासाठी चितळे बंधू हा ब्रँड ओळखला जातो. चवीची परंपरा अबाधित राखताना आणि त्याबाबत कोणतीही तडजोड न करता बिंजबार™ चे ध्येय भारतीय स्नॅक्सना सोप्या, सुटसुटीत, एकदम सोयीस्कर पद्धतीने बार च्या रुपात सादर करणे हे आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून कंपनीने या वैशिष्ट्यपूर्ण बारच्या प्रक्रियेसाठी उत्पादन केंद्राची स्थापना केली आहे. या बारची किंमत विचारपूर्वक १० रुपये ठेवली असून सुरुवातीला मुंबई आणि पुण्यामध्ये हे बार उपलब्ध होतील. कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त प्रिझरव्हेटीव्ह, रंग किंवा फ्लेवर्स या उत्पादनात असणार नाहीत. पारंपरिक भारतीय स्नॅक्स पदार्थांची मूळ चव यात राखण्यात येणार आहे.
भारतीय खाद्य संस्कृतीत भेळ आणि चिवडा यांचे मोठे स्थान आहे. त्यामुळेच चितळे यांनी या लोकप्रिय पदार्थांचे स्नॅक्स बार बनवले आहेत. या पदार्थांभोवती अनेक आठवणी बांधल्या गेल्या आहेत आणि प्रत्येक विभागात हे पदार्थ आपापल्या खास शैलींनी बनवले जातात. पिढ्यानपिढ्या हे लोकप्रिय खाद्यपदार्थ भारतात बनवले जात आहेत. यांसारखे चटपटीत पदार्थ एकदा खाऊन मन भरत नाही. आणखी खाण्याची इच्छा होते, # एक और असे वाटते. आपल्या जिभेवर या स्नॅक्सची चव रेंगाळते आणि आपल्याला हे पदार्थ खायची इच्छा होतच राहते. पॉप संस्कृतीत म्हणतात तसे बिंज इटिंग करावेसे वाटते.
ब्रँड तर्फे बिंज बार™ सर्वाधिक पारंपरिक पद्धतीने आणि तरीही पकड घेईल या पद्धतीने सादर करण्यात आला. एक वेगळे शहरी वळण देत भेळ विक्रेत्यांनी एकदम पारंपरिक पद्धतीने उत्पादनाचे वितरण केले. विक्रेत्यांनी मुंबईच्या कार्टर रोड आणि दादर चौपाटी यासारख्या महत्वाच्या स्थळांवर खवय्यांना एकत्र केले. स्थानिक आणि जागतिक पातळीवरील बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या योजनांसह सध्या हे उत्पादन मुंबई आणि पुण्यात उपलब्ध आहे.

चितळे समूहाविषयी:
१९३९ मध्ये स्थापना झालेला चितळे समूह हा महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या आणि लाडक्या उद्योगसमूहांपैकी एक आहे. मिठाई, डेअरी आणि नमकीन पदार्थांमध्ये त्यांची मक्तेदारी असून जगात अमेरिका, इंग्लंड, मध्य-पूर्व, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि सिंगापूर अशा विविध ठिकाणी ४०० हून अधिक त्यांचे वितरक आहेत. सध्या त्यांची ६ उत्पादन केंद्रे, २१ सुसज्ज दालने आणि ३० चितळे एक्स्प्रेस स्टोअर्स आहेत. सध्या करत असलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढविणे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांत भर घालणे जसे की फिंगर स्नॅक्स, बेकरी, आरोग्यदायी उत्पादने, अॅलर्जीमुक्त उत्पादने, व्हेगन आणि वनस्पतींवर आधारित उत्पादने सादर करून केवळ भारतापुरता मर्यादित नाही तर जागतिक पातळीवरील ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याचे चितळे समूहाचे ध्येय आहे.

Related posts

आईवूमी एनर्जी की प्रस्तुति ई-स्कूटर जीतएक्स

Bundeli Khabar

मिवी ने लॉन्च किया डुओपॉड्स ए350

Bundeli Khabar

एचडीएफसी बैंक ने को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करने के लिए रिटेलियो के साथ की साझेदारी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!