27.1 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20211028 WA0007
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे- मनिलाल शिंपी

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताना स्पीड ४० कि.मी. पेक्षा जास्त नसावी*
रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये काही सुधारणा केल्या आहेत – यामुळे आता लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताना वाहनांची स्पीड ४० कि.मी. पेक्षा जास्त नसावी – असे केंद्र सरकारने सांगितले
काय सांगितले केंद्र सरकारने ?
नवीन नियमानुसार – वाहन धारकाने त्याच्या मागे बसलेल्या ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या डोक्याच्या साईजचे क्रॅश हेल्मेट घालावे
तसेच हे हेल्मेट भारतीय मानक ब्युरो ने मान्यता दिलेली असावी – तसे न केल्यास चालकावर कारवाई करण्यात येईल तसेच मुलांना मोटारसायकलवर घेऊन जाताना स्पीड ४० कि.मी.पेक्षा जास्त नसावी
हेल्मेट कसे असावे
हेल्मेट हे वजनाने हलके आणि अॅडजस्टेबल असावे – वॉटरप्रूफ आणि टिकाऊ असावे – तसेच संरक्षक उपकरणे हेवी नायलॉन किंवा मल्टीफिलामेंट नायलॉनपासून बनवलेले असावे
तसेच सुरक्षा उपकरण मजबूत असावे जे 30 किलोपर्यंतचं वजन सहज सहन करु शकेल – असे परिवहन मंत्रालयाने सांगितले केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय- सर्व नागरीकांसाठी , नक्कीच खूप महत्वाचा आहे.असे डॉ. श्री. मनिलाल रतिलाल शिंपी ( ठाणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा पथक प्रमुख)यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना संगीतले.


Bundelikhabar

Related posts

900 ग्राम वजन और दिल की बीमारी से पीड़ित बच्चे को मिला दूसरा जीवन

Bundeli Khabar

बंदूकीचा धाक दाखवून ट्रान्सपोर्टरसह दोघांचे अपहरण

Bundeli Khabar

माटलवाडी युवा प्रतिष्ठाण कडून दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप

Bundeli Khabar
error: Content is protected !!