25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » ‘क्लब महिंद्रा’चे तामिळनाडूमधील पाचवे रिसॉर्ट सुरू
मनोरंजन

‘क्लब महिंद्रा’चे तामिळनाडूमधील पाचवे रिसॉर्ट सुरू

संतोष साहू/महाराष्ट्र,
तामिळनाडू : ‘क्लब महिंद्रा’ या ‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड’च्या प्रमुख ब्रँडने तामिळनाडूमध्ये आपले सर्वात नवीन रिसॉर्ट ‘जेकेआर रिसॉर्ट एंड स्पा’ सुरू करीत असल्याची घोषणा आज केली. रामेश्वरमच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे रिसॉर्ट रमणीय स्वरुपाचे आणि तब्बल 98 खोल्या असलेले प्रशस्त आहे. अगदी आरामशीर वास्तव्यासाठी आणि ‘बनाने मोमेंट्स मॅजिकल’साठी हे रिसॉर्ट आदर्श आहे.
चित्तथरारक दृश्ये येथे पाहावयास मिळतातच, त्याशिवाय स्कूबा डायव्हिंग, पक्षी निरीक्षण, भव्य मंदिरे, मोहक समुद्री कासवांची झलक, तसेच विविध प्रकारच्या ‘इन-हाउस स्पा थेरपी’ यांसारखे अनुभवही येथे मिळतात. हे रिसॉर्ट सुंदर जलतरण तलावासाठी येथे प्रसिद्ध आहे. या बेटावरील ते एकमेव आहे.
‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड’चे मुख्य रिसॉर्ट ऑफिसर, मिगुएल मुनोझ हे रिसॉर्ट सुरू झाल्याबद्दलचा आनंद व्यक्त करीत म्हणाले, “तामिळनाडू ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि रामेश्वरम हे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय ठिकाण आहे. सर्वोत्कृष्ट सुविधांसह अनोखे अनुभव मिळवून देणे हे ‘क्लब महिंद्रा’चे वैशिष्ट्य आहे. ‘जेकेआर रिसॉर्ट अँड स्पा’सोबतच्या आमच्या सहयोगाने पर्यटकांना हे अनुभव निश्चितच आनंद देतील.”
‘जेकेआर रिसॉर्ट अँड स्पा’ येथे काही अव्वल दर्जाच्या इनडोअर सुविधा देण्यात येतात. यामध्ये अत्याधुनिक जिम, ‘मल्टिपल-क्युझिन डायनिंग’ आणि स्वादिष्ट व ताज्या पेयांनी युक्त असे ‘बिव्हरेज लाउंज’ यांचा समावेश आहे. शहराच्या मध्यभागी स्थित असल्याने या रिसॉर्टपासून बेटावरील सर्व प्रमुख ठिकाणी अगदी सहजपणे जाता येते.
रामेश्वरम हे स्थानिक खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रिसॉर्टमधील चविष्ट प्रादेशिक पदार्थ चाखण्यापासून ते उत्सव साजरे करण्यापर्यंत येथे पर्यटकांना सर्व काही करता येईल. रामनाथस्वामी मंदिर, पंबन ब्रिज हा भारतातील पहिला सागरी पूल तसेच धनुषकोडी अशी नामांकित पर्यटनस्थळे येथे आहेत. धनुषकोडीवरून नयनरम्य सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे हा एक अभूतपूर्व अनुभव असतो.
कुटुंबातील सर्वांनी भेट देण्याजोगे हे रिसॉर्ट आहे. सध्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी येथे येण्यासाठी आदर्श आहे. तसेच उन्हाळ्यातही मार्च ते जुलै या कालावधीत येथे येण्याचे नियोजन करता येते.

Related posts

इनोवेटर्स अवार्ड्स द्वारा आईसीटी4एसडी अवार्ड 2022 से सम्मानित हुईं ईरम फरीदी

Bundeli Khabar

ग्रीन सिनेमा अवॉर्ड 2022 का प्रसारण 3 मई की रात 8 बजे ऑस्कर भोजपुरी टीवी पर

Bundeli Khabar

अक्षय कुमार की आगामी फिल्म के प्रमोशन के लिए ‘बच्चन पांडे की सवारी’ निकली

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!