डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : जिल्ह्यातील वाडा शहरामध्ये राष्ट्रीय नाभिक संघटना यांच्या वतीने श्री शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी संघटनेचे प्रदेश सचिव तुषार भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली।
संत सेना महाराज हे एक सर्व श्रेष्ठ संत पैकी संत होते. त्यांनी समाजाला दिलेली शिकवण ही खरोखर प्रेरणादायी असून प्रत्येक व्यक्तीने त्या शिकवणीचे जर का आचरण केले, तर आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होईल, असे या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित तुषार भोईर यांनी सांगितले।
या कार्यक्रम प्रसंगी नाभिक संघटनेचे प्रदेश सचिव तुषार भोईर, पालघर जिल्हा उपाध्यक्ष किरण बोरसे, महिला जिल्हाध्यक्ष रत्नप्रभा वरुडे, वाडा तालुका अध्यक्ष बबन भोईर, नितिन निकम, विशाल जाधव, भुषण निकम, मनीषा निकम तसेच पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते।

