22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी महिलांना भाऊबीज व दीपावली ची भेट
महाराष्ट्र

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी महिलांना भाऊबीज व दीपावली ची भेट

पाच हजार महिला व बालकाना भेट पोहचविण्याचा मानस – सोन्या पाटील

किशोर पाटील
भिवंडी : भिवंडी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या समाज कल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये जाऊन आदिवासी महिलांना व त्यांच्या मुलांना दीपावली निमित्त भाऊबीज भेट तसेच मिठाई व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम गेल्या अनेक वर्षा पासून करत असल्या मुले या आदिवासी महिला सोन्या दादा पाटील कधी येतील याची आवर्जुन वाट पहात असतात म्हणून येत्या
१ नोव्हेम्बर ते ५ नोव्हेम्बर २०२१ दरम्यान भाऊबीज भेट तसेच मिठाई व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.
प्रथम पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, खोडाला, वाडा ,तलासरी, डहाणू ,या ठिकाणी वाटप करण्यात येईल त्यानंतर मुरबाड, शहापूर ,नाशिक, अहमदनगर ,अकोले, बीड, रायगड ,पनवेल ,पेन या ठिकाणी
वाटप करण्यात येईल. जवळ जवळ पाच हजार साड्या वाटप करण्याचा मानस असल्याचे त्यानी शेवटी संगीतले.

Related posts

कु.प्रसाद शिंपी याचा १५ वा वाढदिवस अनाथाश्रमातील मुलांसोबत साजरा

Bundeli Khabar

मोते सरांचा पुतळा कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहील —- विजय जाधव

Bundeli Khabar

छठ पूजा से पहले वायरल हुआ पद्मश्री मालिनी अवस्थी का गीत ‘आजा बबुआ’ 

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!