22.3 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211020 WA0010
महाराष्ट्र

कल्याणच्या ताल डान्सबार मध्ये धिंगाणा,पोलिसासह सहा जणांवर गुन्हा दाखल

Bundelikhabar

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
कल्याण : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून डान्सबार उशिरापर्यंत सुरु ठेवा, अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ताल बारमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

काय आहे प्रकरण ?
टिटवाळा भागात राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ताल बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखरसोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडे व मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत आहे.
रात्री बारमध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी अजून गाणे सुरू ठेवा अशी मागणी बार मॅनेजरकडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ आहे, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच या ६ जणांनी बार मध्ये धिंगाणा सुरू केला. जवळपास एक तास हा धिंगाणा सुरू होता.

गाणं न वाजवल्यामुळे बिल न भरण्याची धमकी दिली
गाणे सुरू करणार नाही तर आम्ही बिल भरणार नाही असे बोलून बार मालकाला धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसन्स रिवॉल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहाजण बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. बार मालकाने याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना दिली.
महात्मा फुले पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. आज या ६ जणांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी देविदास ढोले करीत आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून लायसन्स रिव्हॉल्वरचा गैरवापर केल्याने त्याचा परवाना तत्काळ रद्द करून पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी नागरीक करीत आहे.


Bundelikhabar

Related posts

पराग शाह यांनी नगरसेवक पदाचे मानधन बंद करण्यासाठी पाठविले पत्र

Bundeli Khabar

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याचा सहा महिन्यांचा कृती आराखडा तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

Bundeli Khabar

डॉ. प्रज्ञा दया पवार यांना गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar
error: Content is protected !!