21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » 9 लाखाचे लाचेचे प्रकरण
महाराष्ट्र

9 लाखाचे लाचेचे प्रकरण

9 लाखाचे लाचेचे प्रकरण ! पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष एडवोकेट.नितीन लांडगे यांच्यासह चौघे लाचालुचपत प्रतिबंधक विभागाच्या’ जाळ्यात

संजिव चौधरी/महाराष्ट्र
पुणे : 9 रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत ( Pimpri Chinchwad Corporation ) पुण्याच्या लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून ( Anti Corruption ) मोठी कारवाई करण्यात आली असून स्टॅडीग कमीटी चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे . लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे , लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे।

अशी माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे . पुणे लाचालुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक राजेश बनसोडे ( SP Rajesh Bansode ) आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा ( AddI SP suhas nadgouda ) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे . मात्र , पुणे अॅन्टी करप्शनने 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेत ( PCMC ) मोठी कारवाई केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे . 9 लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी – चिंचवड आणि पुण्यात ( Pune ) प्रचंड खळबळ उडाली आहे . संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे . लाचालुचपत प्रतिबंधक पथक पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे . कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे।
अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे या लिपिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे . 9 लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती . 2 लाख रूपये पीए मार्फत स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे स्टँडींग कमीटीचे चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे , त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे , मनपा मधील लिपीक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली आहे . स्टॅडीग कमीटी चेअरमन – नितीन ज्ञानेश्वर लांडगे PA – ज्ञानेश्वर पिंगळे क्लार्क = अरविंद कांबळे राजेंद्र शिंदे मागणी – नऊ लाख स्विकारले- दोन लाख ( PA ) टेंडर मंजुर झाले , वर्क ऑर्डर काढणे करीता।

Related posts

श्री गणेश व श्री कृष्ण के हाथों पौधरोपण कर शिवशांति प्रतिष्ठान द्वारा दिया गया जागरूकता का संदेश

Bundeli Khabar

भाजपा उत्तर भारतीय मोर्चा के चिराग गुप्ता बने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

Bundeli Khabar

पांडुरंगजी( भाऊ) सकपाळ यांच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना “एक मदतीचा हात

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!