30.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211017 WA0078
महाराष्ट्र

काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते सरवली गावात विविध विकास कामांचे भुमीपुजन

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरवली गावातील प्रत्येक विभागात जनतेला विकास काय असतो याची अनुभूती आली. विकासकामे करतांना ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कमिटीने अंग झोकून केलेल्या कामामुळे विकासाचे नवे पर्व सरवली भागात सुरु झाले आहे. सात ते आठ महिन्यापुर्वी सुजाण मतदार राजाने निवडुन दिलेल्या लोकप्रतिनीधींनी विकासाच्या कामाची पोहोच पावती आपल्या विविध कामातून दिली असुन विकासाचा आलेख या पुढे देखील असाच चढता ठेवणार असल्याचे प्रतिपादन सरवली ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले.काँक्रीट रस्ते,बंदिस्त गटारे,पेव्हर ब्लाँक रस्ते,नळ योजना इत्यादी विकास कामांना सुरुवात करण्यात आली तेच पुढील प्रस्तावित कामे देखील लवकरच पुर्ण होणार असल्याची प्रतिक्रीया ग्रामपंचायत कमिटी कडून‌ देण्यात आली.दस-याच्या शुभमुहूर्तावर सरवली ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे भुमीपुजन ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आले.यावेळी गांवचे माजी.सरपंच तुळशिराम पाटील,मा.पं.स.सदस्य श्री. गणेश चौधरी,कृषी बाजार समितीचे संचालक भीम चौधरी, सरपंच संध्या नितेश चौधरी,उपसरपंच प्रशांत किशोर मार्के आदि मान्यवर व ग्रामपंचायतिचे सर्व आजी माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

नाना पटोले यांच्या अटकेची मागणी

Bundeli Khabar

देशभक्ति और जवानों को समर्पित अग्निशिखा मंच का ऑनलाइन कवि सम्मेलन व सम्मान समारोह सम्पन्न

Bundeli Khabar

चला पॅरोमेडिकल आरोग्य क्षेत्रात करीअर घडवूया या मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग

Bundeli Khabar
error: Content is protected !!