37.9 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » वकील, पत्रकार व माजी सरपंच यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या विठ्ठल देसले वकीलाचे पितळ उघडे
महाराष्ट्र

वकील, पत्रकार व माजी सरपंच यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या विठ्ठल देसले वकीलाचे पितळ उघडे

आदिवासी महिला व शेतकऱ्यांनी दिली कबुली

ब्युरो/महाराष्ट्र
शहापूर : २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहापूर येथील सबरजिस्टर कार्यालय या ठिकाणी वकिल विठ्ठल देसले कोठारे येथील आदिवासी शेतकरी महिला जमिनीच्या कामाकरिता आले होते. जमिनीच्या मोबदल्यावरून वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. त्यात पत्रकार विठ्ठल देसले यांना मारहाण झाली विठ्ठल देसले यांनी सूडबुद्धीने शहापूर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यां बरोबर काहीही दोष नसताना वकिल हरिश्चंद्र डिंगोर, पत्रकार उमेश जाधव व माजी सरपंच शंकर लखांबरे यांची जाणीवपूर्वक गुन्ह्यात अडकविण्यासाठी नावे घेतली तसेच शहापूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. याबात सब रजिस्टर अधिकारी शहापूर, शेतकरी व इतर लोकांनी आपल्या तोंडून जबानी दिली आहे की, या प्रकरणात पत्रकार, वकील व माजी सरपंच या लोकांचा काही दोष नाही. हे मारहाण करण्यासाठी आले नसून वाद मिटविण्यासाठी आले होते अशी प्रत्यक्ष जवानी दिल्याने वकिल देसले यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याची बाब समोर आली आहे.

मुमरी धरण प्रकल्पात कोठारे येथील शेतकरी यांची जमिनी बाधीत होत आहे. या बाबतचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याकरिता शहापूर सबरजिस्टर कार्यालय येथे २३ सप्टेंबर रोजी खरेदी खत ठेवले होते. यासाठी १८ शेतकरी तेथे उपस्थित झाले होते. परंतु यावेळी यातील दोन शेतकरी मुरबाड येथील वकील विठ्ठल देसले हे आणणार होते. देसले यांनी त्या दोन आदिवासी व्यक्तींना घेऊनही आलेत. महिला शेतकऱ्यांनी वकील देसले यांना विचारणा केली की आमची माणसं तु का लपवली होती. या वरून आदिवासी शेतकरी महिला व वकिल यांच्यात शब्दीक वाद निर्माण झाला. यात वकीलाने महिलांना जातीवाचक शब्द वापरले व त्यांच्यावर हात उगारला. यामुळे वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. यात महिला शेतकरी वकील देसले यांना मारहाण करत होते. पत्रकार उमेश जाधव यांनी हा प्रकार बघीतला असता भांडण सोडविण्यासाठी रजिस्टर ऑफिस मधुन ते खाली धावत आले आणि भांडण सोडवत वकील देसले यांची महिलांच्या कचाट्यातून सुटका केली. त्यांना सुखरुप त्यांच्या गाडीत बसवून पाठवून दिले.

परंतु या घटनेनंतर देसले यांनी शहापूर पोलिस ठाण्यात जाऊन मारहाणीचा गुन्हा दाखल केला. यात मारहाण करणाऱ्या आदिवासी सोबत वकिल हरिश्चंद्र डिंगोर, पत्रकार उमेश जाधव व माजी सरपंच शंकर लखांबरे यांच्यावर देखील जाणीव पूर्वक खोटा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून तपास करावा तसेच खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी वकिल देसले यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली तशा स्वरूपाचे निवेदन देखील पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी पत्रकार संघाचे पदाधिकारी पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांची देखील भेट घेणार आहेत.

या घटनेची पूर्ण माहिती न घेता काही अति उत्साही पत्रकार यांनी एका बाजूने बातम्या प्रसिद्ध करून तसेच सोशल मीडियावर बदनामी होईल अशा प्रकारचे खोटे मेसेज व्हायरल करून वकिल डिंगोरे, पत्रकार जाधव व मा.सरपंच लखांबरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या कारणास्तव बदनामी करणाऱ्यांच्या विरुध्द, मा. उच्च न्यायालयात अब्रुनुकासानीचा दावा पत्रकार संघातर्फे दाखल करण्यात येणार आहे असे पत्रकार उमेश जाधव यांनी सांगितले आहे.

Related posts

फिल्म काली के निर्माता को द्वारकामाई चैरिटी संस्था की सख्त चेतावनी

Bundeli Khabar

Adarsh ​XI, Panvel team became “Badshah”

Bundeli Khabar

धक्का लागण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांवर प्राणघातक हल्ला,घटना सिसीटीव्हीत कैद

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!