27.3 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211017 WA0079
महाराष्ट्र

नवदुर्गाचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिलाले- डॉ.मणिलाल शिंपी

Bundelikhabar

नवदुर्गाचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिलाले- डॉ.मणिलाल शिंपी
दुर्गापूजन करून अंजुर आदिवासी पाडा येथे नारी शक्तीचा आदर एक स्तुत्य उपक्रम मोठ्या ऊस्तवात संपन्न

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : आर.एस.पी. ठाणे यूनिट चे कमांडर डॉ.श्री.मानिलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप, आणि कच्छ युवक संघ यांचा सौजन्याने, दुर्गापूजन करून अंजुर आदिवासी पाडा येथे नारी शक्तीचा आदर एक स्तुत्य उपक्रम मोठ्या ऊस्तह पूर्ण वातावरनात मोठ्या ऊस्तवात संपन्न झाला. जीवनात कोणत्या वेळी कोणती माणसे भेटतात यावरच बरंचसं यश अवलंबून असतं. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर मला चांगली माणसं भेटली. त्यांनी मला ज्यावेळी मदत हवी होती त्या-त्या वेळी मदत करुन सह कार्य केल् आणि ती माणसं कायम माझ्या सोबात जोडली गेली.त्यामधे विशेष उल्लेख मी संपादक किशोर पाटील व दिनेश भाई ठक्कर यांचा करने जणू देवानं त्यांना माझ्या साठीच पाठवलं आहे असे भाऊक गौरोद्वार यावेळी कमांडर डॉ.मणिलाल शिंपी यांनी काढले. तसेच नवरात्र ऊस्तवा मध्ये हातावर काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खऱ्या ६०० नवदुर्गाचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिलाले असेही डॉ.मणिलाल शिंपी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलतना सांगीतले.
भिवंडी तालुक्यातील अंजुर आदिवासी पाडा येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. सुभाष तुलशिराम कोळी, यांचा घरी अंबेमातेचा दरबारात , , वीटभट्टी कामगार, आदिवासी पाड्यातील खऱ्या नवदुर्गा नारी शक्तींचा, आर.एस.पी.कमांडर ठाणे यूनिट डॉ.श्री.मानिलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप, आणि कच्छ युवक संघ यांचा सौजन्याने, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक माननीय किशोर पाटील, अंजुर गावचे माजी सरपंच सुभाष कोळी यांचा प्रमुख उपस्थितीत,नुकताच दुर्गापूजन करून साडी चोळी ची ओटी भरून पूजन करण्यात आले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन श्री स्वामी नारायण ट्रस्ट कल्याण चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर यांच्या तर्फे पुलाव भात व आर एस पी युनिट तर्फे स्वीट गुलाब जाम चे वाटप करण्यात आले, या वेली डॉ.दिनेशभाई ठक्कर अध्यक्ष श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण,आर.एस.पी.अधिकारी श्री. नितीन पाटील, आर.एस.पी.अधिकारी ,श्री. घनश्याम सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार आचार्य श्री. सुरजपाल यादव,श्रीनिवास सिरीमल्ली,राज पाठक ,ग्रामस्थ दादारांम गायकवाड ,विकास कोळी ,अरुन दिनकर, संतोष कोळी ,रंजित वेळीदिपेश कोळी,रसिका कोळी , धनश्री मंदा,रेश्मा,रेखा,संगीता,लीला, कल्याणी कोळी, ग्रांमस्थ,व आदिवासी महिला, मुल,मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम आर एस पी युनिट कमांडर डॉ.मणिलाल रतिलाल शिंपी ,स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप, आणि कच्छ युवक संघ यांच्या सौजन्याने व दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री. किशोर बलिराम पटील व अंजुर गावचे माजी सरपंच श्री.सुभाष कोळी यांच्या सहकार्यामुले यशस्वी झाला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन आयोजक श्री.सुभाष कोळी यांनी केले.


Bundelikhabar

Related posts

आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोविड संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावण्याची केंद्राची महाराष्ट्राला सुचना

Bundeli Khabar

भाजपामध्ये गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची घरवापसी-जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते प्रवेश

Bundeli Khabar

राष्ट्रीय पत्रकार दिनी पत्रकार बंधूंचा अनोखा सन्मान

Bundeli Khabar
error: Content is protected !!