30.4 C
Madhya Pradesh
September 30, 2026
Bundeli Khabar
IMG 20211207 WA0004
महाराष्ट्र

ऑल इंडिया युथ फेडरेशन च्या राज्याध्यक्षपदी कॉ. भाऊराव प्रभाळे यांची बिनविरोध निवड

Bundelikhabar

भिवंडी : मुंबई येथील भुपेश गुप्ता भवन या ठिकाणी ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF) या संघटनेची राज्या कौन्सिल सदस्यांची बैठक संपन्न झाली.त्यावेळी सर्वानुमते नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये ऑल इंडिया युथ फेडरेशन AIYF च्या राज्याध्यक्षपदी कॉ. भाऊराव प्रभाळे, सचिवपदी कॉ. जावेद तांबोळी तर खजिनदारपदी कॉ. इकबाल हुसैन खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर बैठकीला‌ मराठवाड़ा, कोल्हापुर, पुणे, अमरावती, ठाणे व मुंबई विभागातिल कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक विषयावर‌ चर्चा करण्यात आली असुन युवकांसमोर बेरोजगारी, नौकर भरती, कामगार युवकांवर होणारे अत्यचार, उद्योजक युवक कोरोणामुळे अडचणीत सापडलेला आहे. राज्य व केंद्र शासनाचे अन्यायकारक धोरणे या सर्व बाबतीत लढा उभारणे या सारखे विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सह सचिव कॉ. सुभाष लांडे AIYF चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ. गिरीष फोंडे, माजी अध्यक्ष कॉ. प्रसाद घाघरे, माजी सचिव कॉ. संतोष खोडदे यांनी हाजेरी लावली. यावेळी कॉ. भस्मे व कॉ. लांडे यांनी मार्गदर्शन केले तर कॉ. संतोष खोडदे यांनी नविन कार्यकारिणीचा प्रस्ताव मांडला‌ त्याला सर्वांनुमते मंजुरी मिळाली त्यामध्ये राज्याध्यक्ष कॉ. भाउराव प्रभाळे (बिड), राज्यसचिव कॉ. जावेद तांबोळी (कोल्हापुर),खजिनदार कॉ. इकबाल हुसैन खान (ठाणे), उपाध्यक्ष कॉ. फिरोज शेख ( अहमदनगर), सहसचिव कॉ. भिमा पाटील (नाशिक), मार्गदर्शक कॉ. रामदास वागस्कर, कॉ. दिलीप तायडे, कॉ. दिलदार मुजावर इत्यादींचा समावे आहे.


Bundelikhabar

Related posts

शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ गुणवंतांना प्रदान

Bundeli Khabar

अत्यावश्यक सेवांमध्ये राज्यातील पत्रकारांचा समावेश व लोकल प्रवास अनुमति साठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Bundeli Khabar

अश्लीलता फैलाने वाले को घर में घुसकर मारेंगे: अध्यक्ष करणी सेना

Bundeli Khabar
error: Content is protected !!