21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या समाज सेवकांमुले आदिवासी पाड्या पर्यन्त पोहचलो – मणिलाल शिंपी
महाराष्ट्र

संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या समाज सेवकांमुले आदिवासी पाड्या पर्यन्त पोहचलो – मणिलाल शिंपी

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : आर.एस.पी. ठाणे यूनिट चे कमांडर डॉ.श्री.मानिलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री.दिनेश भाई ठक्कर,रोटी डे ग्रुप, आणि कच्छ युवक संघ यांच्या संयुक्त विद्यामाने,संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दुर्गापूजन करून खणा नारलाने ओटी भरुन नवरात्र ऊस्तवा मध्ये हातावर काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खऱ्या ९०९ नवदुर्गाचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिलाले- आदिवासी नारी शक्तीचा आदर एक स्तुत्य उपक्रम मोठ्या ऊस्तह पूर्ण वातावरनात संपन्न झाला. जीवनात कोणत्या वेळी कोणती माणसे भेटतात यावरच बरंचसं यश अवलंबून असतं. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर मला चांगली माणसं भेटली. त्यांनी मला ज्यावेळी मदत हवी होती त्या-त्या वेळी मदत करुन सह कार्य केल् आणि ती माणसं कायम माझ्या सोबात जोडली गेली.त्यामध्ये विशेष उल्लेख मी संपादक श्री. किशोर पाटील ,डॉ.दिनेश भाई ठक्कर,डॉ.सोन्या पाटील, समाज सेवक श्री. रामचंद्र देसले, श्री. यशवंत सोरे,श्री. श्रीधर पाटील व आदी संस्था व सामाजिक कार्यकर्ते, यांचा समावेश आहे, जणू देवानं त्यांना माझ्या साठीच पाठवलं आहे असे भाऊक गौरोद्वार यावेळी कमांडर डॉ.मणिलाल शिंपी यांनी काढले. तसेच नवरात्र ऊस्तवा मध्ये हातावर काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खऱ्या ९०९ नवदुर्गाचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मिलाले असेही डॉ.मणिलाल शिंपी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलतना सांगीतले. आदिवासी पाडा अंबेमातेच्या दरबारात , , वीटभट्टी कामगार, आदिवासी पाड्यातील खऱ्या नवदुर्गा नारी शक्तींचा, आर.एस.पी.कमांडर ठाणे यूनिट डॉ.श्री.मानिलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप, आणि कच्छ युवक संघ यांच्या सौजन्याने, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक माननीय किशोर पाटील, यांच्या सह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दुर्गापूजन करून साडी चोळी ची ओटी भरून पूजन करण्यात आले.
या वेळी डॉ.दिनेशभाई ठक्कर अध्यक्ष श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण,आर.एस.पी.अधिकारी श्री. नितीन पाटील, आर.एस.पी.अधिकारी ,श्री. घनश्याम सोनवणे, याच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम आर एस पी युनिट कमांडर डॉ.मणिलाल रतिलाल शिंपी ,स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप, आणि कच्छ युवक संघ यांच्या सौजन्याने व दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री. किशोर बलिराम पाटील, तरूण नागडा,किशोरी व्यास,प्रभाशंकर शुक्ला,जितेंद्र सोनवणे, बाळासाहेब भोसले,यांचा सहकार्याने ९०९ साड्यांचे वाटप तुळजापूर , अक्कलकोट, मानिवली पाडा,टिटवाळा, कातकरी पाडा,मोहने, माळेगाव, आदिवासी पाडा, आधारवाडी,वाडेघर पाडा, अंजुर गाव भिवंडी आणि मुरबाड तालुक्यातील बावघर, गेगाव, अस्लोली, या ठिकाणी
यांच्या सहकार्यामुले करण्यात आले आहे .

Related posts

महाराष्ट्र: 17 से खुलेंगे स्कूल

Bundeli Khabar

Rainbow Pride of India fashion show

Bundeli Khabar

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक – २०२२ कार्यक्रम जाहीर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!