23.6 C
Madhya Pradesh
August 30, 2026
Bundeli Khabar
IMG 20220723 WA0005
महाराष्ट्र

राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मैत्री संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क कार्यशाळेचे सलग १० व्या वर्षी मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेचा मुख्य हेतू समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी कार्यकर्ता घडवणे. त्या कार्यकर्त्याला समाजातले सामाजिक प्रश्न काय आहेत याची जाणीव करून देणे. ते प्रश्न सोडवताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुठले गुण असावेत, कार्यकर्त्याचे तत्व काय आहे, मूल्य काय आहे, कार्यकर्ता म्हणून कोणते संविधानिक कार्य कसे करावे, संवाद कौशल्य, लेखन कौशल्य, गटकार्य, नेतृत्वगुण, विविध मानवी अधिकारां बद्दलची माहिती, महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा याबाबत माहिती तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच काही संस्थांमध्ये शैक्षणिक भेट घडवण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम १२ ते १५ आठवडे असून दर रविवारी १० ते ५ वाजेपर्यंत असणार आहे. सदर कार्यशाळेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि युसुफ मेहेर अली सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

नावनोंदणीसाठी अंतिम दिनांक १ ऑगस्ट २०२२ आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर नावनोंदणी करावी. शिक्षणाची अट नाही. १८ वर्षांवरील सर्व नागरिक ह्या कार्यशाळेसाठी नावनोंदणी करू शकतात. नावनोंदणीसाठी संपर्क – संयोजक – सुरज भोईर ९९६९६८६०१४


Bundelikhabar

Related posts

उद्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष मोहिम; जिल्ह्यात गावस्तरावर सुक्ष्म कृती आराखडा तयार करावा

Bundeli Khabar

‘बायजूस – अक्षयपात्र फाउंडेशन’ गरीब बच्चों की शिक्षा के लिये गठंबधन

Bundeli Khabar

मोहने येथील शांताराम पाटील शाळा येथे मोफत अँटीजेन आणि आरटी- पीसीआर टेस्ट उपलब्ध

Bundeli Khabar
error: Content is protected !!