28.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » महिलांनी आत्मनिर्भर बनावे, सूसंस्कूत समाज घडविण्याकडे महिलांनी लक्ष द्यावे ,न्यायाधिश एम एम माळी
महाराष्ट्र

महिलांनी आत्मनिर्भर बनावे, सूसंस्कूत समाज घडविण्याकडे महिलांनी लक्ष द्यावे ,न्यायाधिश एम एम माळी

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिंवडी : मूलगा आणि मूलगी यांच्यामधील भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी ,शिक्षणाचा हक्क मिळावा त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो,याच बरोबर मूलीच्या अस्तित्वाचे महत्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मूळीकडे ओझे म्हणून पाहण्याचा दूष्टीकोण हळूहळू बदलताना दिसत आहे. देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचाही मोलाचा वाटा आहे .स्त्रिया अनेक क्षेत्रात पूरूषाच्मा खाद्याला खांदा लावून काम करत आहेत.महिलांनी आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे,अन्याय सहन न करता त्याविरोधात अवाज उठविणे,त्याच बरोबर सूसस्कूत समाज घडविण्या करिता महिलांनी पूढाकारा घ्यावा असे अव्हाहन भिंवडी दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधिश एम एम माळी यांनी खरीवली येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
भिंवडी तालूका विधी सेवा समितीच्या वतीने भिंवडी तालूक्यातील खरीवली येथील विवेकानंद पब्लिक स्कूल व ज्यूनिअर काँलेज येथे जागतीक कन्या दिना निमित्त कायदेविषयक जनजागृती व्हावी या करिता कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते या वेळी न्यायाधिश एम एम माळी यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणींना सामोरे जावे लागते,न डगमगता यश संपादन करून समाज जाग्रूती ,कायदेविषयक जनजागृती करावी असे मत भिंवडी न्यायालयाच्या न्यायाधिश एच वाय कावले यांनी व्यक्त केले. तर मिलालेल्या संधीच विद्यार्थ्यांनी सोन कराव,कठोर परिश्रमामधूनच सावित्रिच्या लेखी घडायला हव्यात असे स्प्ट मत विवेकानंद महाविद्यालयाचे उपाध्यक्ष वजेष्ठ विधिज्ञ दिनेश्वर पाटील यांनी केले . या वेळी विवेकानंद पब्लिक स्कूल,व ज्यूनिअर काँलेज संस्थेचे अध्यक्ष शाताराम अगिवले,अँड धनजंय चौधरीअँड शर्मिला घोडविदे यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.अँड यूवराज कदम अँड रोहीदास पाटील, रोटरीक्लब अबाडी विभागाचे अध्यक्ष विकास जाधव प्रविण घूगले उपस्थित होते.
या वेळी मान्यवराच स्वागत महाविद्यालयाचे अध्यक्ष शांताराम अगिवले, उपाध्यक्ष अँड डी बी पाटील, मूख्याध्यापक सचिन पाटील प्रदिप जाधव यांनी केले.
कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभागी झाले होते तर विद्यार्थ्यीनी मान्यवरामध्ये चर्चासत्रा मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व माहीती जाणून घेतली.सूत्रसंचालन शितल वाघ यांनी तर अभार साधना पाटील यांनी मानले.

Related posts

६१व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गिरगाव केंद्रातून ‘नात्याची गोष्ट’ प्रथम

Bundeli Khabar

गोदरेज मैमोरियल हॉस्पिटल ने जीनोमिक्‍स में रखा कदम

Bundeli Khabar

भारतीय बाजार पेठेत चायनीज अगरबत्त्याचा सुळसुळाट सावधानता बाळगा – यशवंत सोरे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!