31.1 C
Madhya Pradesh
May 13, 2024
Bundeli Khabar
Home » शिवसेनचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई नाशिक महामार्ग अडविला
महाराष्ट्र

शिवसेनचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई नाशिक महामार्ग अडविला

किशोर पाटील/महाराष्ट्र
पडघा : लखिमपुर येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात समिश्र असा प्रतिसाद लाभला. मुंबई नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील तसेच भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. बाजारपेठ बंद असताना काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडण्याचा प्रयत्न केल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले, यानंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा मुंबई नाशिक महामार्गाकडे वळविला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महामार्गावर पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एकत्र जमून महामार्ग मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली. कार्यकर्त्यांनी महामार्गावर बसून ठिय्या मांडल्याने वाहतूक काही काळ बंद होती. यावेळी पोलिसांनी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, विष्णू चंदे, सभापती डॉ. संजय पाटील, उप सभापती विलास पाटील, सरपंच अमोल बिडवी, कुरूंदचे उपसरपंच योगेश पाटील, राहुल पाटोळे, भाई पाटील, मनोहर ठाकरे, साईनाथ पाटील, अभिनव पाटील, काका शेरेकर, बाळा हुकमाली, योगेश जाधव, ज्ञानदेव माघे, संजय पटेल, प्रफुल शेलार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली.

Related posts

राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी द्वारा आगस्ट क्रांती दिन का आयोजन

Bundeli Khabar

वांद्रे, पिवळी, कोशिंबडे येथे शिवसेना व युवा सेना शाखांचे उदघाटन

Bundeli Khabar

उत्तर प्रदेश नवरत्न पुरस्कार से सम्मानित हुए पुनीत खरे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!