22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » ग्रामीण भागात स्तनाच्या कर्करोगाचे जनजागृती शिबीर संपन्न
महाराष्ट्र

ग्रामीण भागात स्तनाच्या कर्करोगाचे जनजागृती शिबीर संपन्न

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : फूड अँड ड्रग्ज कंझ्युमर वेल्फेअर कमिटी (महिला सशक्तीकरण विभाग) आणि शिवकन्या प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम भाग म्हणुन वाडा तालुक्यातील कोंढले येथे स्तनांचा कर्क रोगाविरुद्ध जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी विशेष वक्त्या म्हणुन फूड अँड ड्रग्ज कंझ्युमर वेल्फेअर कमिटीच्या महिला सशक्तीकरण विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नयना कनल (Breast Cancer Survival) उपस्थित होत्या. त्यांनी स्वतः चे अनुभव ग्रामीण भागातील महिलांसोबत शेअर केले. यामध्ये कर्करोगाचे निदान आपण घरीच कसे करू शकतो, कर्करोग झाला असता आपण प्रतिकार कसा केला पाहिजे, याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. फूड अँड ड्रग्ज कंझ्युमर वेल्फेअर कमिटीच्या महिला सशक्तीकरण विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा विशाखा पवार यांनी स्तनांचा कर्करोग कसा रोखू शकतो किंवा त्यासाठी काय काळजी घ्यावी, त्यावरील उपाय काय तसेच कुपोषण बद्दल उपयुक्त माहिती दिली. शिवकन्या प्रतिष्ठानच्या संस्थापिका जिज्ञासा चौधरी यांनी महिला सबलीकरण व शिवकन्या प्रतिष्ठान बद्दल माहिती दिली तसेच फूड अँड ड्रग्ज कंझ्युमर वेल्फेअर कमिटीच्या महाराष्ट्र राज्य अनुराधा गोलीपकर यांनी महिलांचे आरोग्य आणि शिक्षण तसेच स्वकर्तृत्वाने लढा कसा देऊ शकतो याबद्दल यावेळी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवेश पष्टे (आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कृत) यांनी केले. शिबिराचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यत पोहचावा म्हणुन live session ही चालू होते. तसेच बहुतेक महिलांनी हे शिबीर पुन्हा व्हावे आणि आमच्या इतर महिला पर्यंत पोहचावे, अशी मागणी केली आहे. या कार्यक्रमासाठी फूड अँड ड्रग्ज कंझ्युमर वेल्फेअर कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रशांत पवार, शिवकन्या प्रतिष्ठानचे सदस्य किशोर पाटील, अक्षय पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related posts

अंबरनाथ येथील समाज सेवक शिक्षक विलास आंग्रे यांना कोरणा योद्धा पुरस्काराने सन्मानित

Bundeli Khabar

ठाणे जिल्ह्याचे लोकनेते सन्माननीय श्री. सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Bundeli Khabar

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात, नगरविकासमंत्री स्वतः रस्त्यावर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!