22.1 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210929 WA0012
महाराष्ट्र

छञपती शिवाजी महाराज अश्वमेघ पुतळा परिसरात सुरक्षा रक्षकास तात्काळ केबिन बसवा – तुषार कांबळे

Bundelikhabar

शिवशाही व्यापारी संघाचे उपमुख्यअधिकारी यांच्याकडे मागणीचे निवेदन

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
खोपोली : खोपोली नगरपरिषद अंतर्गत शिळफाटा या ठिकाणी सुंदर अश्वमेघ पुतळा उभारण्यात आलेला आहे.
परंतु साहेब त्या ठिकाणी सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला सुरक्षा करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून खुप ञास सहन करावा लागत आहे. ही गंभीर बाब खोपोली चे उपमुख्यअधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन सुरक्षा केबीन तात्काळ बसवण्याचे आदेश संबधीत प्रशासनाला द्यावेत अशी विनंती करण्यात आली. तात्काळ सकारात्मक चर्चा करून लवकरच सुरक्षा केबीन बसवण्याचे आदेश देतो, असे उपमुख्य अधिकारी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आर पी आय कोकण प्रदेश अध्यक्ष तुषार कांबळे,
शिवशाही व्यापारी संघाचे शिष्टमंडळ अध्यक्ष युवराज दाखले, शिवशाही वाहतुक आघाडीचे कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष शेखर छोञे, खालापुर तालुका अध्यक्ष आनिल म्हामुनकर, शिवशाही व्यापारी संघ खोपोली शहर कार्याध्यक्ष तौफीक करजीकर तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

सोशल वर्कर सीमा सिंह और आशीष शेलार ने बच्चों के साथ सेलिब्रेट किया क्रिसमस डे

Bundeli Khabar

सामाजिक कार्यों में योगदान देने वालों को मिला मदर टेरेसा अवार्ड

Bundeli Khabar

ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Bundeli Khabar
error: Content is protected !!