28.5 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210926 WA0005
महाराष्ट्र

भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद

Bundelikhabar

कशोर पाटिल/महाराष्ट्र
भिवंडी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
नानाभाऊ पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रदेश स्तरावरून सक्षम बुथ बांधणीच्या सूचना देऊन आल्याने काँग्रेसचे मतदार संपर्क अंतर्गत बुथ बांधणी अभियान सुरू केले असून भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीने बुथ बांधणी अभियान सुरू केले असून मुंबई-नाशिक महामार्गावरील काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या कार्यालयात नुकतीच बुथ बांधणी अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात विविध तालुक्यात बुथ बांधणी अभियान सुरू आहे त्या माध्यमातून आगामी येणाऱ्या निवडणुका या संदर्भात देखील चर्चासत्र सुरू आहेत।

भिवंडी ग्रामीण बुथ बांधणी अभियाना दरम्यान काँग्रेस ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष शरद ठाकरे,ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पंकज गायकवाड,भिवंडी तालुका युवक अध्यक्ष निलेश भोईर, ठाणे ग्रामीण सचिव सुधाकर ईताडकर, ज्येष्ठ नेते बि.डी पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर शेळके,सोशल मिडीया अध्यक्ष ज्ञानेश्वर हुकमाळी, अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष संजय गायकवाड,ठाणे जिल्हा ग्रामीण मूबीसर पटेल,अध्यक्ष ओबीसी विभाग भिवंडी संतोष ठाकरे,ज्येष्ठ नेते नरेश माळी,ज्येष्ठ नेते शोराब गुजर,अध्यक्ष ओबीसी अशोक पालकर, अशोक मुरूडकर मायनॉरिटी तालुका अध्यक्ष इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

पुलिस सब इंस्पेक्टर पिता को बेटी ने लीवर किया दान

Bundeli Khabar

16 अक्टूबर को होगा ‘मिस्टर एंड मिस शाइनिंग स्टार’ शो

Bundeli Khabar

मुख्यमंत्री उदधव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामना संपादकांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Bundeli Khabar
error: Content is protected !!