30.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » पशुपालकांसाठी ‘किसान क्रेडीट कार्ड’ योजना
महाराष्ट्र

पशुपालकांसाठी ‘किसान क्रेडीट कार्ड’ योजना

प्रमोद कुमार
ठाणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुपालकांसाठी किसान क्रेडीड कार्ड योजना राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी पशुसंवर्धन विभाग तालुकास्तरावर शिबीर आयोजित करत आहे. आतापर्यंत ३८८ पशुपालकांनी यासाठी अर्ज केला असून १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तालुकास्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किर्ती डोईजोडे यांनी केले आहे.
शासनाने पशुपालकांसाठी किसान क्रेडीड कार्ड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या योजने अंतर्गत पशुपालकांना एक लाख ६० हजार रूपयांपर्यंत जनावरांचा चारा, औषधे, लसमात्रा, पशुखाद्यांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे. ही सुविधा दुग्धव्यवसाय, कुक्कटपालन, , शेळी पालन, मेंढीपालन व वराह पालन या व्यवसायांसाठी उपयोगी ठरणार आहे. या योजने अंतर्गत अवघ्या सात टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार असून शासनामार्फत दोन टक्के व्याज सवलत दिली जाणार आहे . पशुपालकाने नियमित कर्जफेड केल्यास ज्यादाची तीन टक्के सवलत मिळणार आहे .
आतापर्यंत कल्याण तालुक्यात २ शिबिरे घेण्यात आली त्यामध्ये ७० पशुपालकांनी अर्ज सादर केले. तर मुरबाड तालुक्यात एक शिबीर संपन्न झाले यामध्ये १७० अर्ज सादर झाले. भिवंडी तालुक्यामध्ये २ शिबीर घेण्यात आली त्यामध्ये ६७ पशुपालकांचे अर्ज सादर झाले तर शहापूर आणि अंबरनाथ तालुक्यात अनुक्रमे १६ आणि ६५ अर्ज पशुपालकांचे सादर झाले.
या योजनेबाबत विस्तृत माहिती व मार्गदर्शन नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) बँक ऑफिस, पंचायत समिती यांचे कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.डोईजोडे यांनी केले आहे

Related posts

शहापूर येथे विधी सेवा आणि शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न

Bundeli Khabar

भिवंडीत आगरी कोळी मेडिकोज तर्फे गौरव सोहळा संपन्न

Bundeli Khabar

अंबाडीत पुरेशी जागा नसल्यामुळे वज्रेश्वरीत ग्रामीण रुग्णालय सुरू करावे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!