17.6 C
Madhya Pradesh
January 25, 2025
Bundeli Khabar
Home » कलकत्त्याकडून चेन्नईचा पराभव
महाराष्ट्र

कलकत्त्याकडून चेन्नईचा पराभव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आपीएलचा १५ वा हंगाम आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केकेआर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. कलकत्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्याच षटकात उमेश यादवने गायकवाडला शून्यावर परतीचा मार्ग दाखवला. ९व्या षटकात चेन्नईची अवस्था ५२/४ अशी झाली होती. १०० धावा तरी धावफलकावर झळकतील का अशी परिस्थिती झालेली असतानाच यंदाच्या हंगामात चेन्नईचं नेतृत्व करणारा रवींद्र जडेजा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची जोडी जमली. त्यांनी ५५ चेंडूंत ७० धावा संघाच्या खात्यावर जोडल्या. त्यातल्या ७ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने महेंद्रसिंग धोनीने केवळ ३८ चेंडूंत बिनबाद ५० धावा फटकावल्या. दोन्ही विस्फोटक फलंदाज खेळपट्टीवर असताना धावसंख्या अजून किमान ३० धावांनी वाढली पाहिजे होती, पण मुंबईतलं उष्ण वातावरण आणि दवामुळे खेळपट्टीवरून चेंडू संथ गतीने येणं यामुळे दोघांचीही दमछाक झाली. २० षटकांच्या अखेरीस १३१/५ असा धावफलक होता.

कसोटी संघात ज्याला प्रवेश नाकारला गेला तो मुंबईचा अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यरच्या साथीने प्रथम फलंदाजीस उतरला. दोघांची जोडी चांगली जम बसवतेय असं वाटत असतानाच ब्राव्होने अय्यरला ७व्या षटकात परतीचा मार्ग दाखवला. त्याचा झेल धोनीने घेतला. नितीश राणा स्थिरस्थावर होतोय असं वाटत असतानाच ब्राव्होने रायडू करवी २१ धावांवर राणाला परतीचा मार्ग दाखवला. १२व्या षटकात सेंटेनरने जडेजाच्या हाती रहाणेला झेल देण्यास भाग पाडले. ६ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने अजिंक्यने केवळ ३४ चेंडूंत ४४ धावा फटकावल्या. श्रेयस अय्यर आणि बिलिंग्सने विजयी लक्ष्यापर्यंत संघाला पोहचवले. बिलिंग्स बाद झाल्यानंतर कलकत्याचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरने चौकार मारत १५व्या हंगामाची विजयी सुरूवात करून दिली. ९ चेंडू शिल्लक असतानाच कलकत्याने १३३/४ खिशात घातला. उमेश यादवने ४ षटकांत केवळ २० धावांच्या मोबदल्यात सुरूवातीचे दोन्ही टिपले आणि म्हणूनच त्याला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.

रविवार अजून जबरदस्त असणार आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर तर पंजाब विरुद्ध बंगळुरू डि. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई अशा दोन लढती होणार आहेत.

Related posts

मीडियाकर्मियों के साथ कृष्णा चौहान मनाया दीवाली मिलन समारोह

Bundeli Khabar

प्रसाद खापर्डे यांना यंदाचा गानसरस्वती पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

महाआवास अभियानात कोकण विभागात ठाणे जिल्हा परिषदेची अव्वल कामगिरी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!