30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210922 WA00062
महाराष्ट्र

प्रभाकर बाविस्कर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला

Bundelikhabar

प्रभाकर बाविस्कर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला…
समाजातील सच्चा समाजसेवक हरपला – मणिलाल शिंपी

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव प्रभाकर बाविस्कर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने नुकताच निधन झाले. प्रभाकर बाविस्कर सर हे नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातील येथील अतिशय गरीब शिंपी कुटुंबातील प्रभावी व्यक्ती महत्व होते.ते नंदुरबार सोडून ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात राहतात, त्यांनी मुंबईसारख्या नगरीत येऊन सेंटर रेल्वे ज्युनिअर कॉलेज येथे प्राध्यापकाची नोकरी मिळवली व नोकरी करूनही समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे अशी मी तळमळ त्यांची समाजाच्या विकासासाठी आणि गरजू गरीब लोकांसाठी काहीतरी मदत उपलब्ध करून द्यावी प्रबोधन करावे यासाठी ते तत्पर असत. निवृत्तीनंतरच्या काळातही त्यांनी विठ्ठलवाडी कल्याण उल्हासनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून समाजामध्ये लौकिक मिळवला होता. कोरोणा सारख्या महामारीतही त्यांनी अनेक गरजू लोकांना रेशन पुरवणे अन्न पुरवणे आणि लसीकरण केंद्रातही ते प्रशासनाला मदतीसाठी स्वयंसेवकांचे काम करीत होते. असे हे माननीय बाविस्कर सर आज अचानक पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने आपल्यातून निघून त्यांनी आपल्या मृत्युपत्रात नोंद केले प्रमाणे मरणोत्तर नेत्रदान करण्याची संकल्पना त्यांच्या पत्नी वर्षा बाविस्कर,मुलगा हार्दिक प्रभाकर बाविस्कर, यांनी त्वरित मातोश्री गोमती बेन रतन सी भाई छे सहियारा आय केअर बँक (आय केअर असोसिएशन ऑफ इंडिया) च्या मेडिकल डायरेक्टर डॉ. जतीन असहर यांच्याशी संपर्क साधून , काउंसलर आणि ॲडव्हायझर वैभवी मॅडम यांच्या सहकार्याने नेत्रदान करून घेतले. व एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला.निशिगंधा गणेश जाधव,गणेश रामदास जाधव, सौ.मंजुषा हार्दिक बाविस्कर,नातवंडे , युगंधरा,ओमकार, हर्ष,पारस, असा परिवार आहे.त्यांचा जाण्याने समाजामध्ये आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी आर एस पी अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी त्यांनी शोक संदेश देताना सांगितले की सन्माननीय बाविस्कर सर हे नात्याने मामा होते. आज मी समाजसेवा करत आहे ते त्यांच्या सेवेची प्रेरणा आहे. सदैव माझ्या पाठीशी राहून ते मला समाजसेवेचे बाळकडू देत होते परंतु आता ते आम्हाला सोडून गेले आणि आम्ही पोरके झालो असे वाटत आहे. परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो ही प्रार्थना या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.


Bundelikhabar

Related posts

उद्या शिक्षक दिनी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

Bundeli Khabar

दो शातिर महिला अपराधी पुलिस गिरफ्त में

Bundeli Khabar

जो पर्यंत हे प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही- डी.के. म्हात्रे

Bundeli Khabar
error: Content is protected !!