34.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » अमेठी ( उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या २३ वर्षा आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी २ सुवर्ण पदक , २ रोप्य पदक व ५ कास्य पदक पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले.
उत्तरप्रदेश

अमेठी ( उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या २३ वर्षा आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी २ सुवर्ण पदक , २ रोप्य पदक व ५ कास्य पदक पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले.

किशोर पाटील/महारष्ट्र
अमेठी : नुकताच पारपडलेल्या पुरुष फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पै. सुरज कोकाटे ( ६१किलो ) वजनी गटात जुनियर वर्ल्ड रोप्य-पदक विजेता पै. रविंदर ( सेना दल ) याला ९- ८ अशा गुणफरकाने हरवून चित्तथराक कुस्ती लढून सुवर्ण पदक पटकावले . तसेच पुण्याचा पै. आदर्श गुंड याने राजस्थान , चंदीगड च्या पैलवानांना हरवून रोप्य पदक पटकावले .
दिनांक १७ ते १९ दरम्यान पारपडलेल्या स्पर्धेचे विविध गटातील पदक विजेते खालील प्रमाणे :-
फ्री- स्टाईल :- ५७ किलो – सुवर्ण पदक
पै. सौरव इगवे ( सोलापूर ) आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे , प्रशिक्षक :- अर्जुनवीर पै. काका पवार
फ्री- स्टाईल :- ६१किलो – सुवर्ण पदक
पै. सुरज कोकाटे ( पुणे ) आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे , प्रशिक्षक :- अर्जुनवीर पै. काका पवार
फ्री- स्टाईल :- ६५ किलो – रोप्य पदक
पै. सौरभ पाटील ( कोल्हापूर ) वीर हनुमान तालीम ,राशिवडे ता. राधानगरी , प्रशिक्षक :- पै. सागर चौघुले
फ्री- स्टाईल :- ७९ किलो – कास्य पदक
पै. समीर शेख ( सोलापूर ) हनुमान आखाडा पुणे , प्रशिक्षक :- गणेश दांगट
फ्री- स्टाईल :- १२५ किलो – कास्य पदक
पै. आदर्श गुंड ( पुणे ) जोग व्यायाम शाळा , देवाची आळंदी पुणे प्रशिक्षक :- आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा . दिनेश गुंड
ग्रीको – रोमन :- ७७ किलो – कास्य पदक
पै. गोकुळ यादव ( मुंबई ) जोगेश्वरी कुस्ती आखाडा
महिला :- ५३ किलो कास्य पदक
स्वाती शिंदे ( कोल्हापूर ) सदाशिव राव मंडलिक कुस्ती केंद्र , मुरगूड ता. कागल , कोल्हापूर प्रशिक्षक :- पै. दादासो लवटे
महिला :- ५९ किलो रोप्य पदक
भाग्यश्री फंड ( अ . नगर ) इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा , प्रशिक्षक :- पै. किरण मोरे
महिला :- ६२ किलो कास्य पदक
सोनाली मंडलिक ( अ . नगर ) ( अ . नगर ) इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा , प्रशिक्षक :- पै. किरण मोरे
पै. सौरभ व पै. सुरज कोकाटे यांची सायबेरिया येथे होणाऱ्या जागतिक अंडर २३ वयोगटातील स्पर्धेसाठी थेट निवड झाली आहे .
सदर स्पर्धेस पंच :- आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड ( पुणे ) व आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच श्री नवनाथ ढमाळ ( सातारा ) व प्रशिक्षक :- श्री संदीप पठारे ( पुणे ) अनिता गव्हाणे ( बारामती ) श्री संभाजी निकाळजे ( अ . नगर ) यांनी मोलाचे सहकार्य केले .
वरील सर्व पदक विजेते खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक, पालक मंडळींचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे तर्फे व दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Related posts

आजमगढ़ और रामपुर चुनाव परिणाम का राष्ट्रपति चुनाव पर पड़ेगा असर: बीजेपी को होगा फायदा

Bundeli Khabar

एकल श्रीहरि का स्नेह सम्मेलन 13 नवंबर को, मुख्य अतिथि के रूप में राज्यपाल आमंत्रित

Bundeli Khabar

पुलिस मुठभेड़ में एक लाख का इनामी बदमाश ढेर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!