37.6 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी कि पैसे गोळा करण्यासाठी हा एक न उलगडणारे कोडे
महाराष्ट्र

घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी कि पैसे गोळा करण्यासाठी हा एक न उलगडणारे कोडे

ब्यूरो/महाराष्ट्र
टिटवाळा : मांडा टिटवाळा परीसर केडीएमसी च्या अखत्यारीत येत असुन केडीएमसी ला मांडा टिटवाळा परीसरातुन मोठ्याप्रमाणावर विविध करांच्या माध्यमातून आर्थिक महसूल उपलब्ध होत असूनही नागरीकांना तसेच व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याचे दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणजे कचरा गोळा करणारी घंटागाडी मुळात घंटागाडी हि संपूर्ण परीसरातील नागरी वस्ती असो वा व्यापारी संकुल येथे जाऊन तिथला कचरा घेउन येण्याचे काम करण्यासाठी नेमलेली असते परंतु परवा एका नियमित करदात्या व्यावसायिकाने तक्रार केली कि घंटागाडीवाला त्यांच्या इथे दररोज कचरा घेण्यासाठी येण्याचे दरमहा २०००/- रुपये द्याल तरच येऊ अशा वक्तव्यावर ठाम होता त्यातून त्या व्यावसायिकाने kdmc चे काहि नियम जोराने ओरडून सांगितल्याने ते घंटागाडीवाले उद्यापासुन येतो सांगुन निघुन गेले त्यानंतर मी जरा माहिती घेतली तर हे घंटागाडीवाले परीसरातील काहि गृहसंकुलांकडुन देखील दरमहा आर्थिक व्यवहार करत असल्याची चर्चा ऐकायला मिळाली पण इथे मोठा प्रश्न उभा राहतो कि ह्याच वर्षी केडीएमसी प्रशासनाने कचरा संकलन माध्यमातून कर वाढवला असुन त्याचा नागरीकांना फायदा काय जर घंटागाडीवाले असे पैसे घेत असलीत तर त्या करांचा पैसा नक्की जातो कुठे तस तर नागरीक आधीच रस्ते,गटारे,खेळांचे मैदान,नानानानी पार्क,विरंगुळा केंद्र अशा विविध सुविधांपासुन करदाते नागरीक वंचित आहेतच पण कचऱ्यासाठी देखील आर्थिक भुर्दंड भरण्यासाठी नागरीक व व्यावसायिक वर्ग नाराज आहे त्यामुळे यापुढे हे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असुन मांडा टिटवाळा परीसरातील नागरीकांना आवाहन आहे कि आपल्या परीसरात घंटागाडी येत नसेल किंवा आर्थिक मागणी करत असतील तर आम्हाला लेखी स्वरूपातील तक्रारीसोबत कर भरल्याची पावती जोडुन द्या आम्ही त्याबद्दल पाठपुरावा करुन तुमच्या समस्येचे निराकरण करु।


विशेष सुचना – आपल्या परीसरात अथवा आपल्या डोळ्यांसमोर जर कुठे हि कचऱ्याचा ढीग अथवा घाणीचे साम्राज्य दिसत असेल तर मोबाईल आडवा धरुन एक छोटीशी video किंवा फोटो मला तिथल्या पत्तासह मेसेज करा
श्री.विजय(भाऊ) मारुती देशेकर
७२०८१३६४११

Related posts

चार विधान सभा जीतने पर दो पार्टी अध्यक्षों द्वारा चिराग गुप्ता का सम्मान

Bundeli Khabar

कुर्ला रेल्वे पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीला केले अटक

Bundeli Khabar

त्या ओला उबेर चालकाच्या खुनाचा तपास पूर्ण.

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!