39.6 C
Madhya Pradesh
May 21, 2024
Bundeli Khabar
Home » वावे येथील नदीवरील पूल खचल्याने वाहतूक बंद
महाराष्ट्र

वावे येथील नदीवरील पूल खचल्याने वाहतूक बंद

वावे येथील नदीवरील पूल खचल्याने वाहतूक बंद
अनेक नागरिकांचे हाल. प्रशासनाचे दुर्लक्ष
गणेशोत्सवापूर्वी हा पूल प्रवासा योग्य करावा

संभाजी मोरे/महाराष्ट्र
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका विभागातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपरोक्त विभागातील गावांमध्ये जाणारा रस्ता दोन दिवस लागणाऱ्या संततधार पावसामुळे पुन्हा वाहून गेलेला आहे यामुळे या पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेली वाहतूक बंद झाली आहे यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र वावे येथे कोविड मात्रा घेण्यासाठी नेहमीच गर्दी असते याचबरोबर वयोवृद्ध नागरिक गरोदर स्त्रिया यांना ही प्राथमिक उपचार करण्यासाठी याच नदीच्या पुलावरून प्राथमिक आरोग्य केंद्र वावे येथे जावे लागते याच बरोबर चिपळूण मुसाडमार्गे चोरवणे निवेपर्यंत असणारी एसटी सुविधा खाजगी वाहतूक प्रत्येक दिवशी शेकडो वाहने ये-जा करीत असतात यामुळे हा पूल लवकरच नव्या स्वरूपात व्हावा अशी प्रत्येकाची मागणी आहे ।

२२ जुलैनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे हा पूल दोन्ही बाजूनी पाण्याच्या पुरामुळे वाहून गेला होता जवळ जवळ एक महिनाभराच्या नंतर स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याने तात्पुरत्या स्वरूपात सुरू झाल्याने या पुलावरून प्रवास करणे सोयीस्कर झाले होते परंतु गेल्या दोन दिवसांपासून संततधार झालेल्या पावसामुळे हा पुल पुन्हा वाहून गेला आहे तरीही काही प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने रेतीवरून घसरुन अपघात होण्याची व जीवित आणि होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे प्रशासनाने लागलीच पाठपुरावा करून प्राथमिक आरोग्य केंद्र वावे मार्गे जाणारा पुल गणेशोत्सवापूर्वी प्रवास करण्यास योग्य करावा पुढील दोन दिवसानंतर शहरातून उत्सवासाठी अनेक चाकर्मनी मागील दोन वर्षानंतर गौरी गणपती साठी आपल्या गावाकडे येणार आहेत यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर वावे येथील नदीवरील पूल प्रवासायोग्य करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत असे वृत्तपत्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले।

Related posts

फैशन ब्रांड मैक्स लिटिल आईकॉन 2022 के विजेताओं की घोषणा

Bundeli Khabar

रायगड – रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी भाजपा युवा मोर्चा कडून मदत रवाना

Bundeli Khabar

प्रिंस ऑफ पॉप अरमान मलिक का नया तमिल गाना एप्पा पार्थालम हुआ रिलीज़

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!