23.4 C
Madhya Pradesh
August 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210907 WA0038
महाराष्ट्र

चोरवणे निवे सापिर्ली गावे महाराष्ट्रातच आहेत ना

Bundelikhabar

जिओचा जीव वेशीवरच गेलेला आणि बीएसएनएल पावसाळ्यातील दिसणाऱ्या चंद्रसूर्य प्रमाणे

संभाजी मोरे/महाराष्ट्र
कोंकण : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या माथ्यावर असलेल्या स्वयंभू श्री नागेश्वर पायथ्याशी वसलेली हि गावे कोणाच्या अवकृपेमुळे दुर्लक्षित आहेत, नक्कीच आम्ही महाराष्ट्रात आहोत का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला होत आहे।


संपूर्ण जगामध्ये त्याच बरोबर देशांमध्ये अगदी कानाकोपऱ्यात मध्ये मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी जाळे पसरले आहे सरकारच्या धोरणानुसार प्रत्येकाला ऑनलाइन पद्धतीने शिक्षण मिळावे आणि कोणीही व्यक्ती संपर्कापासून वंचित राहू नये यासाठी नवीन धोरणानुसार सर्व गावे एका क्लिकवर उपलब्ध झाल्याचे सरकार सांगत आहे. परंतु याला अपवाद म्हणावे की महाराष्ट्राचा नकाशा बाहेर असल्याप्रमाणे खेड तालुक्यातील नागेश्वर देवस्थान पायथ्याजवळ वसलेले चोरवणे निवे सापिर्लि गावे आजही मोबाईलच्या नेटवर्कच्या संपर्कात नाहीत यामुळे येथील ग्रामस्थांना या गावात राहणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाव आणि शहर यामध्ये नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त स्थाईक झालेल्या नवयुवकांना आपल्या गावामध्ये संपर्क करण्यासाठी तासन तास पूर्वीप्रमाणे निरोप्यायासारखे लटकत राहावे लागते, या *गावापासून पाच ते दहा किलोमीटर अंतरावर जिओ कंपनीचे मोबाईल टॉवर आहेत परंतु शोकांतिका अशी आहे की जिओ कंपनीचा जिओ दहा किलोमीटर पूर्वीच मेल्यासारखे असल्यामुळे या गावांच्या वेशीच्या पहिलाच जिओचा जीव जातो (नेटवर्क संपते) असेच म्हणावे लागेल याच बरोबर गावामध्ये कधीतरी अमावस्या-पौर्णिमे प्रमाणे ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये कधीतरी चंद्र सूर्य यांचे दर्शन होते अशा प्रमाणेच काही मिनिटे बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क साधा मोबाईल ला काही प्रमाणात दिसून येते परंतु नेटवर्क आल्याच्या आनंदात असतानाही काही दुःखद घटना घडली असे आपल्या नातलगांना सांगण्यासाठी केलेला फोन उत्तर कार्याच्या दिवशी उत्तर कार्याच्या दिवशी नेटवर्कमध्ये येतो असे बीएसएनएल कंपनीचे हे रडगाणे आहे.
यामुळे या गावांमध्ये राहणारे ग्रामस्थ अगदी अथक परिस्थितीवर मात करून पुढील शिक्षण घेणारे नवयुवक आजच्या परिस्थितीमध्ये सर्वत्र ऑनलाईन शिक्षण झाल्यामुळे लहान मुलांना देखील ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागते या गावातील लहान मुलांनाही पाच ते दहा किलोमीटर पायपीट केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला गवतामध्ये झाडीमध्ये मोबाईल नेटवर्क साठी बसावे लागते, एक तास चालणारे लेक्चर बसल्या जागेवरच बसून शिक्षण घ्यावे लागते यातच कधीतरी नेटवर्क असते नाहीतर जिओचा जीव गेल्या प्रमाणेच होते यातच गवत सदृश्य झाडीमधून सरपटणाऱ्या सापांची ही दंश करण्याची भीती असते, रस्त्याने येणारी वाहने आणि करण्यासाठी असणारी जनावरे यांचीही भीती आहे च या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा पटसंख्येअभावी ओस पडल्या आहेत या शाळेमध्ये शिक्षण देणारे शिक्षक कधीतरी काही मिनिटे उगवतात याच बरोबर या गावाला जोडणारी माध्यमिक शाळा संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रयत्नाने शिक्षण विभागाच्या ऑनलाइन शिकवणीच्या आदेशाप्रमाणे नेटवरची वाट न पाहता गावातील प्रत्येक वाडी मधील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा नक्कीच प्रयत्न करतात . या गावांमध्ये जिओ बीएसएनएल किंवा अन्य कोणत्याही कंपनीचे कायमस्वरूपी नेटवर्क येण्यासाठी ग्रामस्थ तरुण नवयुवक आपल्या परीने प्रशासना कडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहेत यामुळे ग्रामस्थांची ही शोकांतिका कधी पूर्ण होणार कधी या गावातील ग्रामस्थांना प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रशासनाच्या नियमाप्रमाणे नेटवर्क उपलब्ध होणार याबद्दल आज तरी काही सांगता येत नाही।


यामुळेच ही गावे महाराष्ट्राच्या नकाशावर नक्कीच आहेत ना असा प्रश्न निर्माण होतो तरी या विभागात सह्याद्रीच्या माथ्यावर नागेश्वर देवस्थान असून वर्षभर येथे पर्यटकांची हे जा असते यामुळे अनेक जण येथे नेटवर्क नसल्यामुळे या ग्रामस्थांनी प्रमाणे प्रशासनाच्या नावाने खडे बोल बोलतात तरी या सुसंस्कृत गावांचा विकास होण्यासाठी येथील जनतेला चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी नेटवर्क असणे गरजेचे आहे तरी प्रशासनाने याबाबतीत लक्ष घालावे असे या गावांच्या ग्रामस्थांना नक्कीच वाटते।


Bundelikhabar

Related posts

अश्लीलता फैलाने वाले को घर में घुसकर मारेंगे: अध्यक्ष करणी सेना

Bundeli Khabar

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा : भारत पाचव्यांदा जगजेता, इंग्लंडवर ४ गडी राखून विजय

Bundeli Khabar

पंचायत समिती भिवंडी चे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अविनाश मोहिते यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान

Bundeli Khabar
error: Content is protected !!