डॉ दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने राज्यभरातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कोविड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान गुरुजनांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले।
प्रबोधनकारी व्याख्याते, संवेदनशील कवी, विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जाणारे स्वप्नील शंकर पाटील यांना संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले।
स्वप्नील पाटील हे भिवंडी तालुक्यातील अनगांव येथील शारदा विद्यामंदिर या शाळेत मागील बारा वर्षापासून कार्यरत आहेत. अनेक विषयावर महाराष्ट्रभर त्यांची शेकडो व्याख्याने झाली आहेत. ते उत्तम कवी असून अभिजात मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य या साहित्य संघाच्या माध्यमातून साहित्य सेवेसाठी काम करत आहेत. यापूर्वी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रबोधनकारी युवा व्याख्याता राज्यस्तरीय पुरस्कार, युवारत्न पुरस्कार, आदर्श वक्ता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी वक्तृत्व, कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहेत. या पुरस्काराबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे।