27.1 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210904 WA0042
महाराष्ट्र

उद्या शिक्षक दिनी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र

ठाणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने उद्या रविवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मो. ह. विद्यालय ठाणे येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री. कपिल पाटील, राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे।


या कार्यक्रमाला राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हयातील सन्मानीय लोकप्रतिनिधी, सन्मानीय जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी, पुरस्कार प्राप्त शिक्षक यावेळी उपस्थित राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले।


Bundelikhabar

Related posts

मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ जाहीर

Bundeli Khabar

भारतीय राष्ट्रीयत्व संपूर्ण जगाला जोडण्याचा मार्ग मोकळा करते : मोहनराव भागवत

Bundeli Khabar

समाजसेवी देवेंद्र सिंह सैनी को पितृ शोक, उनके पिता की 108 बरस की उम्र में निधन

Bundeli Khabar
error: Content is protected !!