November 29, 2023
Bundeli Khabar
महाराष्ट्र

डॉ.मनीलाल शिंपी यांचा आदर्श नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा-डॉ. किशोर पाटील

मी किती हि मोठा अधिकारी झालो तरी माझ्या शाळेला व गुरुजनांना कधीच विसरणार नाही- डॉ.मनीलाल शिंपी
श्रमिक माध्यमिक विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप!

नंदुरबार : अध्यापक शिक्षण मंडळ, धुळे संचलित शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन , श्रमिक माध्यमिक विद्यालय काथर्दे खुर्द, ता.शहादा जि. नंदुरबार येथे नुकताच शाळेचे माजी विद्यार्थी , परिवर्धे येथील श्री. रतीलाल शिंपी यांचे सुपुत्र, महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडीसा गव्हर्मेंट डायरेक्टर तथा महाराष्ट्र राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर (राजदूत ) तसेच आर .एस .पी . ठाणे कल्याण युनिट चे कमांडर राज्यपाल सन्मानीत आदरणीय डॉ. श्री. मणिलाल रतीलाल शिंपी व दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक ,राज्यस्तरीय तपासणी समिती सदस्य स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी, आरोग्य अधिकारी) तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव राज्यपाल सन्मानीत सन्माननीय डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी भूषविले होते ,व प्रमुख पाहुणे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी आदरणीय आर .एस .पी . ठाणे कल्याण युनिट चे कमांडर राज्यपाल सन्मानीत डॉ. श्री. मणिलाल रतीलाल शिंपी उपस्थित होते , त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर.आर. पटेल , जि. प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र कुवर , गावातील नागरिक श्री भगवान सोमजी पाटील व प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.वसईकर व माध्यमिकचे शिक्षक श्री. डी.पी. सूर्यवंशी,श्री. जी.एम.सूर्यवंशी , श्रीमती. व्ही. व्ही. शिवदे ,श्री.एन. एम. पाटील , श्रीमती. ए.आर. पाटील व शिक्षकेतर कर्मचारी श्री. मनोहर विठ्ठल चौधरी व श्री. विरसिंग जामसिंग पवार व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते।

गुरुने दिला ज्ञान रुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा! या उक्तीप्रमाणे डॉ. श्री. मणिलाल रतीलाल शिंपी यांनी आपल्या गुरुजनांचा आदर गुरु-बंध माझ्या गावचे या प्रमाणे जोपासून ठेवला आहे, ज्या शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले त्याच शाळेत आज एक अधिकारी म्हणून न येता शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून आज ते आपल्या सोबत आहेत, आई वडीला नंतर शिक्षकच आपले गुरु असतात याचे भान सर्व विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे, कारण कसं बोलावं, कसे शिकावे याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे, हे डॉ. श्री. मणिलाल रतीलाल शिंपी यांच्याकडे पाहून दिसुन येत आहे, कारण त्यांनी गुरूने दिलेल्या संस्कार रुपी बाळकडू चे पालन करून शून्यातून विश्व निर्माण केले आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे म्हणायला वावगे ठरू नये असे अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ‌ ‌डॉ. श्री. किशोर पाटील यांनी सांगितले. अध्यापक शिक्षण मंडळ, धुळे संचलित शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन ,श्रमिक माध्यमिक विद्यालय काथर्दे खुर्द, ता.शहादा जि. नंदुरबार या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे व गेल्या तीस वर्षानंतर देखील मी माझ्या शाळेला विसरलो नाही, ” माझी शाळा “आपण निबंध लिहायचो, परंतु माझे बालपण ज्या शाळेत गेले त्या शाळेचे मी काहीतरी देणे लागतो ही उदात्त भावना मनात धरून आज या ठिकाणी माझे परम मित्र दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांच्यासह सदिच्छा भेट दिली मला शिक्षण घेण्यासाठी ज्या अडचणींना सामना करावा लागला तसा या विद्यार्थ्यांनाही करावा लागत आहे त्याची जाणीव ठेवून आज आम्ही त्यांना शालेय दप्तराचे वाटप करीत आहोत तसेच माझ्या प्राथमिक व माध्यमिक या दोन् शाळांना संगणक भेट देणार आहोत तसेच ५०० विद्यार्थ्यांना संपूर्ण दप्तरासह शैक्षणिक साहित्य वह्या ,कंपास, पेन्सिल, पेन चे वाटप येणाऱ्या नवीन २०२२ वर्षात करायचे आयोजन सुरू आहे, दिवसाला ३०० पाव व घरोघरी पेपर विकायचे काम करून दहावी पर्यंत चे शिक्षण हे हाफ पॅन्ट वर पूर्ण केले , याची मला जाणीव असल्यामुळेच गुरूंनी दिलेल्या संस्कार रुपी शिक्षणामुळे मी आज हे उंच शिखर गाठले आहे, म्हणून मी कितीही मोठा झालो तरी माझ्या गुरुजनांना व या शाळेला कधीच विसरणार नाही ज्या शाळेने मला बाळकडू दिले त्या शाळेचा मी कायम ऋणी राहीन असे यावेळी डॉ.श्री. मणिलाल शिंपी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले , तसेच त्यांनी आयराणी भाषेतील कविता गाऊन मुलांचे मनोरंजन केले, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक यांनी हि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सदर् कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी.पी. सूर्यवंशी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. एन .एम. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली,।

Related posts

भगवंत खुबा के हाथों लाइफ टाइम रिकग्निशन अवार्ड से सम्मानित हुए रजनीकांत

Bundeli Khabar

युवा सामर्थ्य प्रतिष्ठान यांच्या तर्फे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम संपन्न

Bundeli Khabar

देवेंद्र फडणवीस ने सुनील राणे के बोरीवली भाजपा कार्यालय, स्वामी विवेकानंद पुस्तकालय और कला केंद्र का उद्घाटन किया

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!