22 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20210904 WA0013
महाराष्ट्र

टेंभवली येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून टेंभवली शाखेतील सल्लागार नरेन भाई गोराडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.यामध्ये रक्तदान शिबीर,महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, चष्मा वाटप, मोफत डोळ्यांची तपासणी, आदींचा समावेश होता. शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.यामध्ये 25 रक्तदात्यानी रक्तदान केले, 81 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, 48 मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, तर 166 जणांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली।


यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा मोनिका ताई पानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य अंकुश पाटील, जू:नांदूरखीचे सरपंच महेंद्र पाटील , ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी, ज्ञानेश्वर मुकादम खारबाव,पोलीस पाटील अच्युत नांदुरकर , काटई शाखा अध्यक्ष मच्छिंद्र घरत ,नवनाथ वाघेरे , पंकज भोईर,कैलास भोईर,आशिष भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। जिजाऊ संस्थेच्या महिला सक्षमीकरणच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा मोनिकाताई पानवे यांनी सांगितले की,जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आम्ही जिथे गरज असेल तेथे आरोग्य शिबीराचे आयोजन करतो.आर्थिक अडचणीमुळे कोणाही उपचाराविना राहु नये हाच प्रमुख उद्देश आमच्या संस्थेचा असतो.तसेच कोणतेही अभियान राबवताना धर्म , जात, पंथ, यांच्या पलीकडे जाऊन लोकांना सेवा पुरवण्याच काम करतो


त्याचप्रमाणे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था टेंभवली चे शाखा अध्यक्ष मंगेश गोरसईकर यांनी सांगितले की,आमच्या गावात जिजाऊ संस्थेचे आरोग्य शिबीराचे आयोजन केल्याने डोळ्यांसंबंधित ज्या लोकांना अर्थिक अडचणीमुळे उपचार घेणे शक्य नव्हते त्यांच्यावर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत उपचार होणार आहेत.महिला वर्गाने या शिबीरात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्यामुळे हिमोग्लोबिन विषयी जनजागृती करण्यात आम्हाला यश आले असे वाटत.त्याचप्रमाणे अनेक नागरिकांना आपले दैनंदिन काम करताना अस्पष्ट नजरेअभावी अनेक अडचणी येत होत्या त्यांना मोफत चष्मा वाटप केल्याने त्यांनी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे व मोनिका पानवे यांचे विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कैलास भोईर यांनी केले।


Bundelikhabar

Related posts

मेकॅनिकल थ्रॉमबेक्टोमीद्वारे स्ट्रोक रुग्णांसाठी अतिरिक्त उपचार पुरवठा

Bundeli Khabar

Rainbow Pride of India fashion show

Bundeli Khabar

गोदरेज मैमोरियल हॉस्पिटल ने जीनोमिक्‍स में रखा कदम

Bundeli Khabar
error: Content is protected !!