24.8 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20211219 WA0019
महाराष्ट्र

भिवंडीत पावणे चार लाखांच्या अवैध गावठी दारूच्या हातभट्टयांवर नारपोली पोलीसांची कारवाई 

Bundelikhabar

चार जणांवर गुन्हा दाखल !

भिवंडी : नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलीमघर येथे खाडी किनारी गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच या ठिकाणी शुक्रवारी नारपोली पोलिसांनी धाड टाकून चार गावठी दारूच्या हातभट्टी उध्वस्त करत तब्बल ३ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चौघांनी अलीमघर येथील बेटावर गावठी दारु करण्यासाठी हातभट्टी लावल्या असल्याची खबर पोलिसांना मिळाली असता नारपोली पोलिसांनी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील व पोलीस उप निरीक्षक रोहन एल. शेलार यांना मिळाली असता आलीमघर येथील खाडीच्या बेटावर चार ठिकाणी चारही आरोपींनी लावलेल्या हातभट्ट्या उध्वस्त करत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरीता लागणारे प्लॉस्टीकचे ड्रम त्यामध्ये दारू तयार करण्याकरीता लागनारे रसायन, भांडे, लाकडे व तयार दारू असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील व पोलीस उप निरीक्षक रोहन एल. शेलार यांच्यासह पोलीस हवालदार ए. वाय बोडके, पोलीस हवालदार नवले, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई सावंत यांनी केली आहे.


Bundelikhabar

Related posts

काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते सरवली गावात विविध विकास कामांचे भुमीपुजन

Bundeli Khabar

ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक

Bundeli Khabar

गुगलद्वारे हेल्थ टेक स्टार्टअप ‘केयरक्सपर्ट’ची निवड

Bundeli Khabar
error: Content is protected !!