25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » सामनाचे पत्रकार दिनेश यादव यांचे दुःखद निधन
महाराष्ट्र

सामनाचे पत्रकार दिनेश यादव यांचे दुःखद निधन

किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : वाड्यातील अभ्यासू पत्रकार व पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष दिनेश यादव यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि.३सप्टें.) संध्याकाळच्या सुमारास दुःखद निधन झाले. यादव यांना धुर्रंधर आजाराने ग्रासले होते, त्यांच्यावर मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या नंतर ते घरी परतले होते मात्र त्यांना पुन्हा त्रास उद्भवल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांनी दवा उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने शुक्रवारी सकाळी त्यांना घरी आणले मात्र या वेळी नियती समोर त्यांचे काही एक चालले नाही आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा स्वास घेतला
दैनिक सामना वृत्तपत्रासाठी ते वाडा प्रतिनिधी म्हणून काम करत होते।

त्यांनी आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांना नेहमीच न्याय देणाचा प्रयत्न केला, तर त्यांच्या परखड लिखाणाने शासकीय अधिकाऱ्यांमध्येही एक प्रकारचा धाक निर्माण झाला असला तरी सर्वसामान्यांंसह अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात त्यांचे सलोख्याचे संबंध होते. यादव यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर शाखेच्या स्थापनेसाठी मोलाचा वाटा उचलला होता. मराठी पत्रकार परिषदेचे खंदे समर्थक गेल्याने पत्रकारांमध्ये दुःखद भावना व्यक्त होत आहेत।

Related posts

एनव्हायरोनिक्सचे लोगो रीब्रँडिंग

Bundeli Khabar

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष सावर्डेकर लोकसेवेसाठी सरसावले

Bundeli Khabar

विधायक सुनील राणे ने एंबुलेंस की चाबियां सिक्किम और नागालैंड के प्रतिनिधियों को सौंपी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!