37.2 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » नवीन कूलिटा ओएसच्या सदरीकरणाने कुका आणणार ग्लोबल स्मार्ट टीव्ही बाजारपेठेत परिवर्तन
महाराष्ट्र

नवीन कूलिटा ओएसच्या सदरीकरणाने कुका आणणार ग्लोबल स्मार्ट टीव्ही बाजारपेठेत परिवर्तन

संतोष साहू/महाराष्ट्र
. पहिली स्वयं-विकसित स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी एक हलका, नितळ आणि अधिक सोयीस्कर अनुभव वापरकर्त्याला देते
कूका स्वतःच्या मालकीच्या ओएससह नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करीत आहे, एक नवीन स्मार्ट टीव्ही इकोसिस्टम तयार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधोरेखित करते

मुंबई – स्मार्ट टीव्ही, सिस्टम आर अँड डी आणि कंटेंट ऑपरेटिंग सिस्टीमचा अग्रगण्य प्रदाता असलेल्या कूका ने आज कूलिता ग्लोबल लॉन्च इव्हेंटमध्ये ब्रँडची पहिली स्वयं-विकसित स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) कूलिता ओएस लाँच केली. सुरुवातीला हे उत्पादन भारत, इंडोनेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम यासह निवडक दक्षिण –पूर्व आशियाई बाजारपेठांमध्ये उपलब्ध असणार आहे. नवीन ओएस स्मार्ट टीव्ही अनुभवात परिवर्तन आणणार आहे जेणेकरून आजच्या इंटरनेट-चालित पिढीसाठी एक हलका, नितळ आणि अधिक सोयीस्कर वापरकर्ता अनुभव प्रदान करणे शक्य होणार आहे.
“आमच्या स्वतःच्या स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीम, कूलिटा ओएसच्या सदरीकरणासह नवीन तंत्रज्ञानाची दिशा जाहीर करताना आम्ही उत्साहित आहोत. ही क्रांतिकारी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम ग्राहकांच्या गरजा विकसित करण्याच्या आमच्या सखोल संशोधन आणि ग्राहक मानसिकता समजून घेण्याचे फलित आहे तसेच आमच्या चमूचे समृद्ध अभियांत्रिकी कौशल्य आणि स्मार्ट टीव्ही अनुभव सर्वांसाठी अधिक सुलभ बनवण्याचे समर्पण या सगळ्यांमुळे हे शक्य झाल्याचे,”कुलीटा ग्लोबल बिझनेस डिपार्टमेंटचे जनरल मॅनेजर राऊल हुआ म्हणाले. “आमच्या समकालीन नावीन्यपूर्ण आणि धोरणात्मक भागीदारींद्वारे, आम्हाला एक मोठी, चांगली स्मार्ट टीव्ही इकोसिस्टम तयार करण्याची अपेक्षा आहे, जी नवीन उद्योग सहयोग आणेल जेणेकरून जगभरातील लोकांना अधिक ट्रेंडी आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादने मिळतील.”

उद्योगातील कमतरता भरण्यासाठी नावीण्याला चालना

ओव्हर-द-टॉप (ओटीटी) टीव्ही मार्केट जगभर विकसित होत आहे आणि विस्तारत आहे, साथीच्या आजारामुळे मोठ्या प्रमाणात लोक टीव्ही पाहण्यासाठी घरी वेळ घालवत आहेत. जरी, स्मार्ट टीव्ही त्यांच्या जटिल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमुळे महाग असतात, तरीही दक्षिण-पूर्व आशियातील अनेक कुटुंबे बजेट-अनुकूल पर्याय शोधत आहेत जे टीव्ही शो, चित्रपट, गेम आणि दर्जेदार मनोरंजनासाठी त्यांची मागणी पूर्ण करू शकतात.
याव्यतिरिक्त, जे स्मार्ट टीव्ही वापरतात त्यांच्याकडे साधारणपणे तीन मुख्य समस्या असतात: ओएसच्या आकारामुळे टीव्ही मेमरी स्पेसची कमतरता, वारंवार सिस्टम फ्रीझ होणे आणि क्लिष्ट यूजर इंटरफेस.
या बाजाराच्या निष्कर्षांसह, कूका ने कूलिता, एक नवीन उप-ब्रँड लॉन्च केला आहे जो टीव्ही ओएस आणि सेवांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो, यामुळे ग्राहकांच्या गरजेनुरूप समाधान प्रदान केले जाते.
कूलिटा ओएस 1.0: ग्राहकांना “कूल अँड क्लियर” अनुभव देणे
कूलिटा ओएस एक लाइट वेब ओएस आहे जो लिनक्स कर्नलवर बनलेला असून एक हलका, नितळ आणि अधिक सोयीस्कर स्मार्ट टीव्ही अनुभव देतो. “कूल अँड क्लियर” डिझाइन संकल्पना लक्षात घेऊन, कूलिटा ओएस 1.0 मध्ये एक सोपा आणि नेव्हिगेट करण्यासाठी सुलभ युजर इंटरफेस आहे.
कूलिटा ओएस 1.0 मनोरंजनासाठी पर्याय आणि अॅप्लिकेशनचा आनंद घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. नवीनतम यूट्यूब 2021 अॅप उच्च-गुणवत्तेच्या व्हिडिओंमध्ये अमर्यादित अक्सेस प्रदान करते, तर सीसी प्लस, कूलिटा ओएस द्वारे समर्थित सर्वसमावेशक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, रिअल-टाइम अपडेट्स आणि सानुकूलित कंटेंटच्या शिफारशींसह जागतिक आणि स्थानिक कंटेंटची श्रेणी प्रदान करते. कुका द्वारे विकसित एक विशेष सीसी कास्ट या मालकीच्या तंत्रज्ञानासह, वापरकर्ते टीव्हीवरून लोकल एरिया नेटवर्क (LAN) ला कनेक्ट करून कोणत्याही इंटरनेट किंवा वाय-फाय कनेक्शनशिवाय अँन्ड्रॉईड डिव्हाइसवरून टीव्ही स्क्रीनवर कंटेंट प्रोजेक्ट करू शकतात. इतर मनोरंजन पर्यायांमध्ये पूर्व-स्थापित लाइट क्लाउड गेम्स, इनबिल्ट इंटरनेट ब्राउझर, अॅप स्टोअर आणि बरेच काही समाविष्ट आहे.
विवेकी ग्राहकांच्या विविध गरजा भागवण्यासाठी, कूलिटा ओएस 1.0 मध्ये विविध वापरकर्ता-अनुकूल कार्ये देखील समाविष्ट आहेत, ज्यात डेटा सेव्हर समाविष्ट आहे जे लोकांना त्यांचा डेटा वापर सहजपणे व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी रिअल-टाइम डेटा रीमाइंडर प्रदान करते आणि डोळ्यांसाठी संरक्षण मोड मध्ये आरामदायक आणि आनंददायक लो –ब्ल्यु –लाइट मध्ये टीव्ही पाहण्याचा अनुभव प्रदान करते.

कूका एस3यू प्रो: होम एंटरटेंमेंट रीईमॅजिन करणारा पहिला कूलिटा टीव्ही

कूलिटा ओएस 1.0 वैशिष्ट्यीकृत जगातील पहिला स्मार्ट टीव्ही म्हणून, कूका एस3यू प्रो मध्ये 32-इंच डायरेक्ट व्ह्यू एलईडी (डीएलईडी) स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन 1366×768 पिक्सेल आहे. 16: 9 च्या स्क्रीन रेशो आणि पाच पिक्चर मोड्स (स्टँडर्ड, विविड, गेम, मूव्ही आणि स्पोर्ट्स) सह, या टीव्हीने उत्कृष्ट डिटेल्स देण्यासाठी, रंग ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि गोंगाट कमी करण्यासाठी गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान स्वीकारले आहे। याव्यतिरिक्त, हे दोन 10W हाय-पॉवर सिंगल स्पीकर्स, कूका साउंड एईएस (ऑडिओ वर्धित सराउंड) तंत्रज्ञान, तसेच डॉल्बी ऑडिओ इफेक्ट्ससह समृद्ध आणि समग्र ऑडिओ अनुभव प्रदान करते।
आजपासून, कूका एस3यू प्रो फ्लिपकार्टवर फक्त रुपये 14,999 च्या किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहे, जे पारंपारिक टीव्ही आणि सध्या बाजारात अँड्रॉइड टीव्ही यांच्यातील किंमतीतील अंतर कमी करण्यात मदत करते आणि उत्तम स्मार्ट टीव्ही अनुभव देते. ग्राहकांना सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी, कूका 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान फ्लिपकार्टवर एक विशेष प्रास्ताविक विक्री सुरू करेल, जिथे कूका एस 3 यू प्रो INR 12,999 च्या सवलतीच्या किंमतीसाठी उपलब्ध असेलयाव्यतिरिक्त, कूका आपल्या नवीन वापरकर्त्यांना 50 हून अधिक सेवा केंद्रांद्वारे भारतभर एक वर्षाची सर्व्हिस वॉरंटी देत आहे।
सामरिक भागीदारीसह स्मार्ट टीव्ही इकोसिस्टम मजबूत करणे
जगभरातील ग्राहकांना अखंड आणि समग्र करमणुकीचे अनुभव देऊ शकेल अश्या कंटेंट साठी। भविष्यात, कूका आणि कूलिटा उच्च दर्जाची उत्पादने प्रदान करण्यासाठी, कंटेंट प्रदाता, टीव्ही ब्रँड आणि स्मार्ट फंक्शन प्रदात्यांपासून ते आयओटी सपोर्ट प्रदाते, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि हार्डवेअर पुरवठादारांपर्यंत, संपूर्ण उद्योग परिसंस्थेतील कंपन्यांसह धोरणात्मक भागीदारीमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल।

Related posts

ठाणे जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाच्या प्रकल्प संचालक पदी श्री. दादाभाऊ गुंजाळ यांची नियुक्ती

Bundeli Khabar

जिला परिषद के महिला एवं बाल विकास विभाग द्वारा आयोजित ‘पोषण माह सितंबर 2021’ अभियान के उद्घाटन

Bundeli Khabar

फिल्म प्रडूसर और प्रडक्शन हाउस की लापरवाही की वजह से हुआ हादसा.

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!