30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210826 WA0024
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाच्या प्रकल्प संचालक पदी श्री. दादाभाऊ गुंजाळ यांची नियुक्ती

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
ठाणे : जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाच्या प्रकल्प संचालक पदी श्री. दादाभाऊ गुंजाळ यांची नियुक्ती झाली आहे. श्री.गुंजाळ हे महाराष्ट्र विकास सेवेच्या 2004 बॅचचे अधिकारी असून यापूर्वी ते कोकण भवन येथे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उपसंचालक पदावर कार्यरत होते.
मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ गावचे असणारे श्री.गुंजाळ यांची २००४ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत शासकीय सेवेत निवड झाली।

परीविक्षाधीन काळावधीत त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेत परीविक्षाधीन गट विकास अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर गट विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे उत्तम कामाची मोहोर उमटविल्यावर नव्यानेच सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनच्या उप संचालक पदी नियुक्ती झाली. येथे त्यांनी २०१२ ते २०१५ या कालावधीत काम करताना बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विकसित केलेले दशसूत्री मॉडेल देशभरात राबविण्यात येत आहे. नंतर त्यांनी सहाय्यक आयुक्त (चौकशी ) कोकण भवन येथे काम केले. चौकशीचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी हस्तपुस्तिका तयार केली.त्याचा उपयोग शासकीय कामासाठी उपयुक्त ठरत आहे।


त्यानंतर २०१६ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. या कालावधीत झिरो पेन्डशी आणि डेली डिस्पोजल (Zero Pendency आणि Daily Disposal) हे अभियान राबवून नियमित कामांचा निफटारा जलदगतीने होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यानच्या काळात बचत गटांसाठी शून्य टक्के व्याजदरांची सुमतीबाई सूबळीकर आणि महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या अस्मिता योजनेच्या निर्मिती विशेष सहभाग राहिला आहे।


Bundelikhabar

Related posts

आंबिवली बल्याणी मार्गावर रिक्षाचा अपघात

Bundeli Khabar

सारी दिवाळी” विसावली या झोपडीत माझ्या – शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर

Bundeli Khabar

ऋषभ शेट्टी ‘जय हनुमान’ में निभाएंगे हनुमान का किरदार, प्रशांत वर्मा की फिल्म का फर्स्ट लुक रिलीज…

Bundeli Khabar
error: Content is protected !!