34.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » प्रोडिजी फायनान्सचा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात
व्यापार

प्रोडिजी फायनान्सचा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात

प्रोडिजी फायनान्सचा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात,
परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना कर्जपुरवठा करणार

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी हक्काचा कर्जपुरवठादार प्रोडिजी फायनान्स इंग्लंड, चीन आणि फ्रान्स सारख्या देशांमधील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा मदतीचा हात पुढे केला आहे, जे साथरोग काळात तात्पुरते बंद झाले होते।


आता कोविड-१९ ची जगाभोवतालची मगरमिठी सैल झाली असून कर्ज निधी देण्यासाठी नवीन गुंतवणूकदार सरसावले आहेत, प्रोडिजी फायनान्स, आपल्या अनोख्या जागतिक क्रेडिट मॉडेलसह, विद्यार्थ्यांना कर्जासाठी पुन्हा अर्ज करण्याचे आणि स्टेम विषय, एमबीए अभ्यासक्रमासाठी आणि परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन करत आहे।


प्रोडिजी फायनान्सचे भारतीय प्रमुख मयंक शर्मा म्हणाले, “हे वर्ष साहजिकच कठीण होतं, कोविड-१९ चा वित्तीय बाजारपेठेवर होणारा परिणाम म्हणजे आम्ही ज्या देशांना निधी देऊ शकतो त्या देशांमध्ये आमच्यावर निर्बंध घालण्यात आले होते. पण निष्क्रिय बसण्याऐवजी आम्ही साथीच्या रोगानंतरच्या जगासाठी तयारी केली आणि विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना निधी देण्यासाठी नवीन कल्पनांवर विचारमंथन केले. जसजसे देश त्यांच्या लसीकरण मोहिमेचे प्रमाण वाढवू लागले आणि बाजारपेठ पुन्हा रुळावर आली. तसतसे आम्ही अतिरिक्त गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याने भौगोलिक मर्यादा ओलांडत आमच्या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात उत्सुक आहोत. आता, आम्ही अधिक विद्यार्थ्यांना निधी देऊ शकतो, आमच्या वाढत्या ग्राहक संख्येत आनंदी चेहरे जोडू शकतो.
भारतातील अग्रगण्य उच्च शिक्षण कर्ज सुविधा ब्रॅंड प्रोडिजी फायनान्स अलीकडेच अमेरिकेतील १२ नवीन महाविद्यालयांसोबत भागीदारी केली असून, एकूण संख्या ८०० महाविद्यालये आणि विद्यापीठांशी करार करत १००० पदव्युत्तर अभ्यासक्रमांत प्रवेशाचा मार्ग सुकर केला आहे. या ब्रँडने आपल्या ओव्हरसबस्क्राइब, उद्घाटन एए-रेटेड सोशल बाँड जारी करून जागतिक-प्रथम यश मिळवले।

Related posts

विझने तीन नवीन बॉडी डिओड्रंट लॉन्च केले,दीर्घकाळ टिकणारा सुगंध आणि बॅक्टेरिया प्रतिबंधक फिक्सेटिव्ह

Bundeli Khabar

झूमकारचा आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार इजिप्त आणि फिलिपाइन्समधील कंट्रीहेडची नियुक्ती जाहीर

Bundeli Khabar

रोहित शर्मा ने ‘इनफिनिटी लर्न’ ऐप लॉन्च किया

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!