25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » आब्जे येथे सामाजिक संस्थांचे शैक्षणिक महोत्सव
महाराष्ट्र

आब्जे येथे सामाजिक संस्थांचे शैक्षणिक महोत्सव

आब्जे येथे सामाजिक संस्थांचे शैक्षणिक महोत्सव
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र
पालघर : आदिशक्ती मुक्ताई ज्ञान प्रसारक मंडळ, वाडा व प्रेरणा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. प्राथमिक शाळा आब्जे ता. वाडा येथे २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप पंचायत समिती उपसभापती अमोल पाटील, समाजसेवक डॉ.भाई वलटे, नरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच कोरोना काळात विशेष कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला।


कोरोणामुळे सुमारे दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांना शिक्षणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध होत नव्हत्या, ही गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणासाठी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मिळावे; त्याचप्रमाणे त्यांना शैक्षणिक कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आदिशक्ती मुक्ताई ज्ञान प्रसारक मंडळ वाडा चे अध्यक्ष कमलाकर पाटील व प्रेरणा फाउंडेशनचे संस्थापक राजेंद्र भांगरे यांनी यांनी विविध सामाजिक संस्था एकत्र करून विद्यार्थ्यांना साहित्य, खाऊ वाटप करून मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील कोरोना काळामध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या योध्यांचा यथोचित सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला।


प्रेरणा फाउंडेशन मध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेत असलेली नीलिमा गहला हिने घरची परिस्थिती हलाखीची असताना वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथून बँकिंग क्षेत्रातील विषयांतून ९८% गुण मिळवून विशेष यश संपादन केले. तसेच कोरोना काळात ‘कमर्शिअल आर्टिस्ट’ (मेक अप मन) म्हणून अभ्यासक्रम घेऊन विशेष कला सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते।


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा फाउंडेशन चे संस्थापक राजेंद्र भांगरे तर उपसभापती अमोल पाटील, समाजसेवक डॉ.भाई वलटे, जनसेवा संस्थेचे नरेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आपले मानवाधिकार फाउंडेशन चे संचालक डॉ.दिपेश पष्टे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर मढवी, संतोष निखुर्डे, ग्रामपंचायत सदस्या सविता पाटील, अनंता पाटील, सुचित्रा रोठे, प्रकाश तुंबडा, प्रेरणा फाउंडेशनचे नरेश खरपडे, अंकुश गहला आबजे शाळेतील सर्व शिक्षण वृंद, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रेरणा फाउंडेशन व आदिशक्ती मुक्ताई ज्ञान प्रसारक मंडळ, वाडा यांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्वच स्तरातून केले जात आहे।


परिसरातील सर्व जि. प.शाळा तपासून त्यांच्या अडचणी जाणून घेणार व डिजिटल करून सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. तसेच आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार.
उपसभापती: अमोल पाटील

Related posts

बिग बुल बिजनेस मीट 2021 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातचे लोकांनी उपस्थिति

Bundeli Khabar

क.डों.म.पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

Bundeli Khabar

राकांपा युवा कांग्रेस की ओर से समीक्षा बैठक का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!