23.1 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210828 WA0022
महाराष्ट्र

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना 2019 च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधितांना 2019च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे।


राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम 2019 च्या महापूरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे।


Bundelikhabar

Related posts

डॉ. प्रज्ञा दया पवार यांना गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

“स्वामी” तर्फे कॅन्सरग्रस्तांना ब्लँकेट आणि शिधा वाटप

Bundeli Khabar

तेरा अनुकंपाधारकांचा जिल्हा परिषदेच्या सेवेत समावेश

Bundeli Khabar
error: Content is protected !!