30.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220117 WA0004
महाराष्ट्र

पिंपळास गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा

Bundelikhabar

पिंपळास गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा!
शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रशासनाला इशारा!
लोक प्रतिनिधींचे व्यावसाईकाना अभय का?

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मौजे पिंपळास गावातील शेतकरी श्री. धोंडू तुकाराम पताळे, श्री. तानाजी मारुती पताळे यांची पिंपळनेर ग्राम पंचायत हद्दी मधे स्वतःच्या मालकीची जमीन आहे, या जमिनीचा दिवाणी न्यायालय भिवंडी मधे दावा चालु असुन निर्णय प्रलंबित आहे तसेच ही जमीन वरील शेतकर्‍यांची वडिलोपार्जित व कब्जा वहिवाटीत असुन सदर जमिनीमध्ये दर वर्षी भातशेती लागवड केली जाते असे असताना भुमि वर्ल्ड इंडस्ट्रियल चे मालक प्रकाश नानजी पटेल व त्यांचे सहकारी रणजित बाबरे, संतोष गायकवाड व ईतर यांनी पैशाच्या बळावर व पोलिस प्रशासनाला हाताशी धरून व शासनाची दिशाभूल करून रॉयल्टी न घेता परस्पर रात्रीच्या वेळेत भरणी चालु केली आहे, त्यामुळे शेतकर्‍यांनी जागेवर जाऊन भरणीचा काम रोखला व सवाल केला की, या जमिनीचा न्यायालयात दावा चालु आहे तसेच निर्णय न्याय प्रविष्ट आहे मग असे असताना तुम्ही आमच्यावर दादागिरी करून कोणाच्या हुकुमावरून भरणी चालु केली आहे? यामुळे प्रकाश पटेल ने त्याच्या साथीदारांमार्फत उलट शेतकर्‍यांवरच गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत, पोलिस शेतकर्‍यांना तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तुम्ही जमिनीवर जाऊ नका नाहीतर तुमच्यावर अजुन गुन्हे होतील. या भीतीमुळे वरील शेतकर्‍यांच्या घरातील सर्व महिला व लहान मुले भर थंडीच्या दिवसांमधे शेतावर जाऊन रात्रभर जागत आहेत, कारण प्रकाश पटेल हा बिल्डर रात्रीच्या वेळेत शेतकर्‍यांच्या जमिनीवर भरणी करून शेती गाडत आहेत. व या कामी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन व पोलीस अधिकारी व्यापारी वर्गाला साथ देत आहे असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळत नसून शासन, प्रशासन चे अधिकारी प्रकाश पटेल याना सहकार्य करत आहेत, अशा कठीण परिस्थितीत तोंड देण्यापेक्षा शेतकर्‍यांनी लवकरच आत्मदहन करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, प्रशासन व पोलिस अधिकारी यांना दिला आहे.


Bundelikhabar

Related posts

नारी शक्ति को नमन – डॉ. सुमाया रेश्मा

Bundeli Khabar

दक्षिण एशिया के पत्रकारों का संगठन ‘सारा’ के राष्ट्रीय संयुक्त सचिव पद पर जीतु सोमपुरा की नियुक्ति

Bundeli Khabar

मिथिला जनसेवा समिति के प्रयास से शिव मंदिर का निर्माण कार्य शुरू

Bundeli Khabar
error: Content is protected !!