31.7 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम
महाराष्ट्र

ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम

किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : पालघर जिल्हय़ात करोना रुग्णांची संख्या एकीकडे घटली असली तरी गेल्या काही दिवसांपासून हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होत असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत अनि जिल्ह्यातील उपकेंद्रे तसेच खासगी दवाखान्यांत मागील काही दिवसांपासून या रुग्णांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे।


गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. या बदलत्या वातावरणाच आरोग्यावर परिणाम होऊ लागल्यामुळे साथीचे आजार पसरण्यात वाढ होऊ लागली आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशी विविध कारणे घेऊन रअ प्राथमिक उपकेंद्र तसेच खासगी दवाखान्यांत गर्दी करू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून पाऊस थांबला, असून उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. या वातावरणात झालेला बदल आणि प्रदपणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. यामुळे आजाराची लक्षणे कळताच नागरिकांनी जवळच्या प्राथमिक उपकेंद्र किंवा खासगी दवाखान्यात जाऊन औषधोपचार घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून घरोघरचे साथ आजाराची माहिती घेणारे सर्वेक्षण सुरू केले आहे. ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे आजार असतील तर आरोग्य केंद्रात किंवा आपल्या डॉक्टरकडे जाण्याच्या सूचना रहिवाशांना देण्यात येत
आहेत।


ताप, सर्दी, खोकला झाल्यास हा आजार सामान्य आहे असे न समजता तात्काळ नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व नजीकच्या आरोग्य केंद्रात जावे. घरगुती उपचारांना प्राधान्य देऊ नये. अशा आजारात लहान मुलांची सर्वाधिक काळजी घ्यावी. कोरोनाची रॅपिड अँटीजेन टेस्ट चाचणी तात्काळ करून घ्यावी. अंगावर काढलेला आजार नंतर त्रासदायक ठरू शकतो याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवावी
-डॉ. समाधान पगारे,
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कूडूस

Related posts

देशातील ८२% विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत जाण्यास उत्सुक: ब्रेनली

Bundeli Khabar

आशाराम बापू के खेमानी आश्रम में मनाया गया मातृ-पितृ दिवस सैकड़ों की संख्या लोगो ने लिया भाग

Bundeli Khabar

प्रेस क्लब में ओमप्रकाश पांडेय लिखित ‘आँचल’ कविता संग्रह का लोकार्पण

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!