30 C
Madhya Pradesh
May 8, 2024
Bundeli Khabar
Home » कोरोना च्या या वातावरणात महाआरोग्य शिबिर घेऊनअजून कोरोना संपला नाही हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दाखवून दिले – राजेश नार्वेकर
महाराष्ट्र

कोरोना च्या या वातावरणात महाआरोग्य शिबिर घेऊनअजून कोरोना संपला नाही हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दाखवून दिले – राजेश नार्वेकर

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक , श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष ,श्री संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक माननीय श्री संजयजी भोकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे, वृत्तवाहीनी प्रमुख श्री रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.राकेश टोळे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने पत्रकार संघाचे कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष श्री. नितीन मनोहर शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात आपली भुमिका बजावणारे ठाणे शहरातील पत्रकार व नागरिकांसाठी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन ,तेरना स्पेशालिटी हाँस्पीटल अँड रिसर्च सेंटर, नेरूळ व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गडकरी रंगायतन तालीम हाँल येथे गुरुवार दिनांक २६/०८/२०२१ रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला ठाण्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री .राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त ठा.म.पा. श्री.संदीप माळवी, आमदार श्री.संजय केळकर, आमदार श्री.निरंजन डावखरे, संपादक जनादेश श्री.कैलाश म्हापदी, एम.सी.एच.आय.क्रेडाई -अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता, निर्माते दिग्दर्शक श्री. प्रविण तुरडे, सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस कमिटी श्री.मनोज शिंदे,अध्यक्ष इटंक काँग्रेस ठाणे श्री.सचिन शिंदे नगरसेविका ठा.म.पा. प्रतिभा मढवी, जिल्हा माहीती अधिकारी ठाणे श्री. अजय जाधव, उपशहर अध्यक्ष मनसे ओवळा माजिवडा मंजुळा डाकी उपस्थित होते. त्यांचबरोबर पत्रकार संघाचे पदाधिकारी कोकण विभागीय सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादकश्री. किशोर बळीराम पाटील, पालघर जिल्हाअध्यक्ष श्री.विकास पाटील,ठाणे शहर सचिव श्री.मिलिंद दाभोळकर, सल्लागार श्री. प्रमोद घोलप, उपाध्यक्ष श्री. संजय भोईर, कार्याध्यक्ष श्री.अतुल तिवारी, संघटक श्री.मनोज कदम, संपर्क प्रमुख श्री. सतीश कुमार भावे,सहसचिव श्री.अमित जाधव, कल्याण संपर्क प्रमुख मिनल पवार, सहसंपर्क प्रमुख – प्रशांत मोटे, कार्यकारणी सदस्य श्री.अश्विन कांबळे,कार्यालयीन व्यवस्थापक श्री.अभिषेक चव्हाण, सह वुत्तवाहीनी प्रमुख संतोष पडवळ, प्रसिध्दी प्रमुख – देवेंद्र शिंदे, सुबोध कांबळे, अमित गुजर व इतर सदस्य – संजय ताबंडे, प्रसाद जावडे, राहूल लाड, राजेंद्र गोसावी, ख्वाजा शेख, सुभाष जैन,देवेंद्र वाईरकर, कार्यक्रम व्य़वस्थापक व न्यूज मराठी व तरूण आव्हान प्रतिनिधी पत्रकार मनस्वी चौधरी,पत्रकार पल्लवी होनखंडे, पत्रकार मनीष तळदेवकर, पत्रकार मनाली मोरे,पत्रकार वंशिका चाचे, समाधान अवताडे, अश्विनी भालेराव उपस्थित होते।


सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक श्री संजय जी भोकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग ,ठाणे शहर,आरोग्य धनसंपदा फाउंडेशन ,तेरना स्पेशालिटी हाँस्पीटल अँड रिसर्च सेंटर, नेरूळ व ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या महा आरोग्य शिबिराला शुभेच्छा देतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे व हा स्तंभ देखील चांगले स्तुत्य उपक्रम राबवत आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी कोरोना काळात आपली भुमिका बजावणारे ठाणे शहरातील पत्रकार व नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करून कोरोना च्या या वातावरणात अजून कोरोना संपला नाही हे पत्रकार संघाने दाखवून दिले आहे असे ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष महाआरोग्य शिबिरा च्या ठिकाणी मार्गदर्शन करताना सांगितले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन देखील जिल्हाधिकारी व आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमात ठाण्यातील शासकीय, राजकीय ,सामाजिक , क्षेत्रातील मान्यवर,ज्येष्ट नागरिक, व पत्रकार असे मिळून २००ते २५० नागरिकांनी या मोफत शिबिरांचा लाभ घेतला .नागरिकांनी आरोग्य तपासणी करून त्यांना असलेल्या आरोग्य विषयक शंकाचे निरसन तेरना हास्पीटलचे डाँ.जितेंद्र पाटील यांनी सुस्पष्ट भाषेत करून योग्य सल्ला दिला.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागाचे पदाधिकारी व ठाणे शहराचे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली।

Related posts

जहांगीर आर्ट गैलरी में प्रसिद्ध कलाकार कानन खांट की कला प्रदर्शनी का उद्घाटन

Bundeli Khabar

वसईच्या नागले गावातील “यश”

Bundeli Khabar

एन.के.जी.एस.बी. निवडणूकीत आशीर्वाद पॅनलला मराठा समाजाचा पाठिंबा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!